मुंबई | राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला मुंबई क्राइम ब्रांचच्या सायबर सेलनं अटक केली. जयसिंह राजपूत असं या आरोपीचं नाव आहे.
व्हॉट्सअॅपवर मेसेज करून आरोपीने आदित्य ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याचा चाहता असल्याचा दावा त्याने स्वतः केला आहे.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना आलेल्या धमकीचे आज विधानसभेत पडसाद उमटले. या प्रकरणात कर्नाटक सरकारकडून सहकार्य मिळत नसेल तर मी स्वत: कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना भेटून चर्चा करेल, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी सांगितलं. तर, या संपूर्ण प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात येणार असल्याची घोषणा गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केली.
सत्ताधाऱ्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अनेक मुद्द्यांकडे विधानसभेचं लक्ष वेधलं. आदित्य ठाकरेंना धमकी आली त्याचा आम्ही निषेध करतो, असं देवेंद्र
मंत्र्यांना कोणी धमकी देत असेल तर त्याला ठेचलं पाहिजे. या गंभीर प्रकरणाला राजकीय करण्याचा प्रयत्न सुनील प्रभू यांनी केला, असंही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना सांगितलं आहे.
दोन प्रकरणातील आरोपी महाराष्ट्रातील होते. दोन हत्या महाराष्ट्रात झाल्या. दोन कर्नाटकात झाल्या. कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांची हत्या कर्नाटकात झाली. गुन्हेगार हे गुन्हेगार असतात त्याला राजकीय वळण देता कामा नये. ट्विटरवर जे ट्रेंडिग झालं. त्याची चौकशी करा माझी मागणी आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.
महत्वाच्या बातम्या-
आदित्य ठाकरे येताच नितेश राणेंकडून ‘म्याऊ… म्याऊ’च्या घोषणा, पाहा व्हिडीओ
शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता; ‘हा’ बडा नेता भाजपच्या वाटेवर?
‘आपला बाप आजारी असताना…’; उद्धव ठाकरेंवर टीका करणाऱ्या भाजप नेत्यांना आव्हाडांनी झाप झाप झापलं
Corona लस घेतलेल्यांसाठी गुड न्यूज; ‘ही’ दिलासादायक बातमी आली समोर
“अजित पवारांना मुख्यमंत्र्यांचा चार्ज दिला, तर ते 4 दिवसांत राज्य विकून मोकळे होतील”