महाराष्ट्र Top news मुंबई

अमृता फडणवीस राजकारणात येणार?; देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य

Devendra Fadnvis And Amruta Fadnvis

मुंबई | विरोधीपक्ष नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या सतत चर्चेत असतात. कधी त्यांच्या गाण्यांमुळे तर सोशल नेटवर्किंगवरील वक्त्यांमुळे अमृता या चर्चेत असल्याचं चित्र पहायला मिळतं.

अनेक विषयांवर अमृता या ट्विटरच्या माध्यमातून आपली मत मांडत असतात. यावरुन त्या भविष्यात राजकारणात येतील का?, असा प्रश्न अनेकांना पडलाय.

अमृता फडणवीसांच्या राजकीय प्रवेशाबाबत देवेंद्र फडणवीस यांनी आता भाष्य केलं आहे. ते एका मुलाखतीत बोलत होते. सध्या वैयक्तिक स्तरावर राजकारण सुरु आहे, असं त्यांनी सांगितलं आहे.

राजकारणात सगळ्या गोष्टींना माणसाने तयार असायला हवं. पण यात अनेकांचे चेहरे उघड झाले. अमृता फडणवीस हे वेगळं व्यक्तिमत्व आहे. त्यांचा स्वत:चा छंद, आवडी आहेत. पण जाणीवपूर्वक त्यांना टार्गेट केलं जातं, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

राजकारणात मी पातळी सोडली नाही आणि कधीच सोडणार नाही. अमृता फडणवीस कधीच राजकारणात येणार नाही हे मी बोललेला जपून ठेवा, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.

देवेंद्र फडणवीस यांना सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. सरकारला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. हे सरकार पाच वर्षे पूर्ण करेल असं तुम्हाला वाटतं का? असा सवाल त्यांना करण्यात आला. यावर फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं.

भारताचा राजकीय इतिहास पाहिला तर अशी सरकारं फार काळ चालत नाहीत. ती अंतर्विरोधाने पडतात. जेव्हा सरकार अंतर्विरोधाने पडतात त्यावेळी आज पडेल की उद्या पडेल हे सांगता येत नाही. जेव्हा सरकार सर्वात मजबूत आहे असं वाटतं तेव्हाच ते पडतं, असं फडणवीस म्हणाले.

दरम्यान, या सरकारला पडण्याचीच खूप धास्ती आहे. त्यांना ही सत्ता म्हणजे 20-20 ची मॅच वाटते. कधी संपेल सांगता येत नाही. त्यामुळे त्यांनी मागील दोन वर्षात जेवढं लुटता येईल, तेवढं लुटण्याचं काम केलं, अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केलीये.

महत्त्वाच्या बातम्या- 

“मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जेवायला बोलवलं तर…” 

“कोण म्हणतं की लोकसभा कामासाठी आकर्षक जागा नाही” 

महाविकास आघाडीचं सरकार कधी पडणार?; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं 

“फडणवीसांच्या नेतृत्वात सरकार येणार, आम्ही महाराजांच्या गनिमी काव्यानं वागणार” 

‘…तर ताबडतोब डॉक्टरांकडे जा’; कोरोनाच्या नव्या Omicron व्हेरिएंटची लक्षणं आली समोर