मुंबई | राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या 10 दिवसांच्या सत्ता नाट्याचा अंक आता संपुष्टात आला आहे.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे (Uddhav Thackeray Resigns). शिवसेनेतील नेत्यांची बंडखोरी आणि 10 दिवसांच्या सत्तानाट्यानंतर आज अखेर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पद सोडावं लागलं आहे.
उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपचे आमदार एकमेकांना पेढे भरवत होते. चंद्रकांत पाटील हे देवेंद्र फडणवीस यांना पेढे भरवत असल्याचे वृत्तवाहिनीवर पाहायला मिळाले.
यानंतर चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संबाद साधला. सरकार स्थापनेबद्दल ते काही बोलले नाही. उद्या बहुमत चाचणी होणार आहे. यानंतर आम्ही बसू आणि निर्णय घेऊ असं म्हटलं.
भाजपच्या नेतृत्वाखाली पुढील अडीच वर्षांत सत्तेवर येणारे सरकार पुढील 25 वर्षे चालेल, असं प्रतिपादन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आमदारांना मार्गदर्शन करताना केलं आहे.
अन्यायाविरोधात आवाज उठवण्याची एकनाथ शिंदे यांच्या गटांने हिंमत केली. त्यांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. येत्या अडीच वर्षांत महाराष्ट्रातील प्रश्नांना न्याय द्यायचा आहे, असंही ते म्हणालेत.
महत्त्वाच्या बातम्या-
शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का; ‘हा’ बडा नेता जाणार शिंदे गटात
उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, महाविकास आघाडी सरकार कोसळलं
सर्वोच्च न्यायालयाचा महाविकास आघाडीला झटका, उद्या बहुमताची चाचणी होणार
मोठी बातमी! औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर होणार, कॅबिनेट बैठकीत 3 महत्त्वाचे प्रस्ताव मंजूर
मोठी बातमी! बहुमत चाचणीपूर्वी देवेंद्र फडणवीसांचा राज ठाकरेंना फोन