“ठाकरे सरकार कधीही अडचणीत येऊ शकतं”

मुंबई | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devenddra Fadnavis) यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर(Mahavikas aghadi) सडकून टीका केली आहे. राज्याच्या अधिवेशनात भाजपच्या (BJP) आमदारांचं संख्याबळ कमी व्हावं म्हणून त्यांना वर्षभर सस्पेंड केल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

भाजपच्या 12 आमदारांविना अधिवेशन घेण्यावर फडणवीस म्हणाले, ‘ज्या घटना घडल्या नाही त्याची कारणं सांगून आमच्या आमदारांना सस्पेंड केलं आहे.

वर्षभरासाठी सस्पेंड करण्याचं कारण म्हणजे आपल्याच आमदारांवर विश्वास नाही. सरकार कधीही अडचणीत येऊ शकतं. हा विश्वास आहे. त्यामुळे आर्टिफिशियली आमची संख्या कमी करण्याचा कार्यक्रम सुरू आहे. म्हणूनच आमचे 12 आमदार निलंबित केले आहेत. 12 आमदार निलंबित करून अध्यक्षांची निवडणूक घ्यायची यावरून सरकार किती असुरक्षित आहे हे दिसून येतं, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.

संसदेचं अधिवेशन इतका काळ अधिवेशन चालू शकतं तर महाराष्ट्राचं का चालत नाही? राज्यात सर्वात कमी वेळ अधिवेशन घेतलं जात आहे. लोकशाही जेवढी कुलुप बंद करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

अनेक राज्यांचे अधिवेशन फार काळ चालू शकतात. माहराष्ट्रात मानसिकताच नाही. या सरकारने लोकशाही बंद केली आहे. या सरकारमध्ये रोकशाही सुरू आहे. आणि रोखशाही म्हणजे प्रत्येक गोष्टीला थांबवणं, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर केला आहे.

दरम्यान, स्थगिती खंडणी लूट भ्रष्टाचार हे सर्व प्रकार या सरकारमध्ये पाहायला मिळत आहे. ते कधीच पाहिलं नव्हतं. विरोधकांनी बोलू नये म्हणून त्यांचं एक वर्षासाठी निलंबित केलं जात आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात अक्षरश काळीमा फासण्याचं काम होत आहे, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

पेपर फुटीप्रकरणी मोठी कारवाई, बड्या भाजप नेत्याला अटक झाल्याने खळबळ 

“संप मागे घेतला नाहीतर मी स्वत: एसटी चालवत सेवा सुरू करणार” 

कोरोनामुक्त पुरुषांसाठी जास्त घातक ठरतोय Omicron?; संशोधनातून हैराण करणारी बातमी समोर 

“पाठीत खुपसलेला खंजीर उलटा फिरवायला वेळ लागणार नाही” 

“सरकारने राष्ट्रपती राजवट लागण्यासाठीची कोणतीही कारणे शिल्लक ठेवली नाहीत”