“शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना पुढील 40 वर्षे विरोधी पक्षात राहावे लागणार”

अहमदनगर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोले येथे झालेल्या महाजनादेश यात्रेमध्ये विरोधकांवर सडकून टीका केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, सुप्रिया सुळे आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना पुढील 40 वर्षे विरोधी पक्षात राहावं लागणार आहे, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलतांना लगावला आहे.

महाजनादेश यात्रेला राज्यात जनतेचा आदेश मिळाला असून, निवडणुकीची फक्त आता औपचारिकता बाकी राहिली आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच भाजपवासी झालेले पिचड पिता-पुत्र मधुकरराव पिचड आणि वैभव पिचड यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे.

महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकापर्यंत ज्यांचं नाव आहे, असे जेष्ठ माजी मंत्री मधुकरराव पिचड आणि पाच वर्षे आमच्या बरोबर विधानसभेत शांत राहून अभ्यासपूर्ण मुद्दे मांडणारे वैभव पिचड भाजपत आलेत, याचा मनस्वी आनंद आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-