मुंबई | नितेश राणे यांनी आमच्या नेत्यांचा अवमान केला आहे. आम्ही हा अवमान खपवून घेणार नाही. जसे तुमच्यासाठी मोदी आहेत. तसेच आमच्यासाठी आदित्य ठाकरे आहेत. एक तर नितेश राणेंनी झाल्याप्रकाराबद्दल माफी मागावी अन्यथा त्यांना सभागृहातून निलंबित करावे, अशी मागणी शिवसेना नेते सुहास कांदे, सुनील प्रभू आणि भास्कर जाधव यांनी केली.
नितेश राणेंना निलंबित करण्यासाठी शिवसेनेच्या सदस्यांनी सभागृहात प्रचंड गोंधळ घालत नितेश राणे हाय हायच्या घोषणा दिल्या. गोंधळ प्रचंड वाढल्याने सभागृहाचं कामकाज दहा मिनिटासाठी तहकूब करण्यात आलं.
सुहास कांदे यांनी सभागृहात पॉइंट ऑफ इन्फर्मेशनद्वारे नितेश राणे प्रकरणाकडे लक्ष वेधलं. यानंतर शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी यावरून आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळालं.
मी अध्यक्षांची परवानगी घेतली आहे. मला पुरेपूर बोलू द्या. मागच्या अधिवेशनावेळी मी तालिका अध्यक्ष होतो. त्यावेळी फडणवीस साहेब तुम्ही विधान भवनाबाहेर अभिरुप विधानसभा भरवली. त्यावेळी हेच सदस्य अनेक वक्तव्य करत होते. युट्यूबवर क्लिप आहे. माझ्याकडे क्लिप आहे. याच संधीची गेले कित्येक दिवस मी वाट पाहत होतो, असं भास्कर जाधव म्हणाले.
नितेश राणेंनी दादांना उद्देशून म्हटलं, दादा मी इथे असंसदीय शब्द बोलतो. भास्कर जाधव म्हणजे काय? त्याला कुणी तरी सांगितली दोन बिस्किटं देतो, जा त्याला चाऊन ये. त्याला चाऊन येणारा कुत्रा म्हणजे भास्कर जाधव असं नितेश राणे त्या क्लिपमध्ये बोलले, असं जाधव यांनी सांगितलं. यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत नितेश राणेंना पुन्हा सुनावलं आहे.
नितेश राणे जे बोलले ते चूकच आहे. आम्ही त्याचं समर्थन करणार नाही, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणेंना फटकारले. तसेच नितेश राणेंच्या माध्यमातून विरोधकांचा एक सदस्य निलंबित करण्याचा सरकारचा डाव आहे, असा दावाही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
वेंद्र फडणवीस यांनी नितेश राणेंना फटकारतानाच सरकारच्या मनसुब्यांचीही पोलखोल केली. विरोधी पक्षाकडे पाहायचंच नाही असा नवा पायंडा पडला आहे का. असं काही ठरलं आहे का? आम्ही लोकशाहीत लढणारे लोकं आहोत. रडणारे नाहीत. या ठिकाणी नितेश राणे संदर्भात उपस्थित झाला. आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली. कोणत्याही पक्षाच्या सदस्यांनी असं वागू नये, असं फडणवीस म्हणालेत.
महत्वाच्या बातम्या-
‘तो चाऊन येणारा कुत्रा म्हणजे भास्कर जाधव’; विधानसभेत पुन्हा राडा
“अजित पवार स्वतःच्या नाकातला शेंबुड पुसा अगोदर”
‘…तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते”