“मी जाती-पातीत न बसणारा, तरी मोदींनी मला मुख्यमंत्री केलं”

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज भाजपच्या महाजनादेश यात्रेचा समारोप नाशिकमध्ये झाला. यावेळी नाशिकमधील सभेला मोठी गर्दी होती. मोदींच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या 5 वर्षांच्या कार्याचा थोडक्यात आढावा मांडला. तसेच यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी नरेंद्र मोदींचं तोंडभरून कौतुक केलं आहे.

मी सोशल इंजिनिअरिंग अर्थात जाती-पातीच्या राजकारणात बसत नसतानाही, माझ्यासारख्याला मोदींनी मुख्यमंत्री केलं. या पाच वर्षात मी पारदर्शी आणि प्रामाणिकपणे सरकार चालवण्याचं काम केलं, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आहे.

ज्या नाशिकमध्ये रामराज्याची संकल्पना सुरु झाली त्याठिकाणी सभेची सांगता होत आहे. काँग्रेस राष्ट्रवादीवाले जनतेला विसरले म्हणून लोकांनी त्यांना घरी बसवलं, असं म्हणत फडणवीसांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर निशाणा साधला.

जिथे गेलो त्याठिकाणी लोकांचा प्रचंड आशीर्वाद मिळाला. जनादेश यात्रेला मिळालेला प्रतिसाद आमच्यामुळे नाही तर मोदीजींमुळे आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

दरम्यान, मी यात्रा काढली त्यावेळी शरद पवार म्हणाले मुख्यमंत्री हिशोब देत आहेत. पण तुमची मानसिकताच राजेशाहीची आहे. त्यामुळे लोकांनी सेवकाला निवडून दिलं, असा टोला फडणवीसांनी शरद पवारांना लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या-