मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 5 जूनच्या अयोध्या दौऱ्याविरोधात गोंडाच्या नंदनीनगरमध्ये आजही आंदोलन सुरूच आहे. याच अनुषंगाने भाजप खासदार आणि कुस्ती संघाचे अध्यक्ष भूषण शरण सिंह यांनी नंदिनी नगरमध्ये संत संमेलन आयोजित केलं होतं. संतांचा आदेश आणि संतांच्या भेटीनंतर पुढील रणनीती ठरवली जाईल, असं ब्रिजभूषण सिंह म्हणाले होते.
उत्तर भारतीयांची राज ठाकरे यांनी माफी मागावी अशी मागणी खासदार बृजभूषण सिंह यांनी केली आहे. यावर महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीसांनी आता यावर भाष्य केलं आहे.
रामाचे दर्शन कोणीही घेऊ शकतो, भगवान रामचंद्रांच्या चरणी येणाऱ्या कुण्याही व्यक्तीचा विरोध केला जाऊ नये. उत्तर प्रदेशमधील खासदार राज ठाकरेंचा विरोध का करत आहेत याबाबत कल्पना नाही. मी बृजभूषण यांच्याशी चर्चा करणार नाही, असंही देवेंद्र फडणवीस म्हणालेत.
राज ठाकरे यांनी भोंग्यांच्या मुद्द्यावरुन सरकारकडे अपेक्षा ठेवू नये. राज्य सरकार विरोधात आम्ही लढतोय. राज ठाकरेंनी पण लढलं पाहिजे, असं ते म्हणाले.
ज्या सरकारने इतक्या मर्यादा सोडल्यात. हनुमान चालीसा म्हणण्याची घोषणा केल्यानंतर जे राजद्रोहाचा गुन्हा लावून खासदार, आमदारांना 12 दिवस जेलमध्ये ठेवतात, त्यांच्याकडून दुसरी अपेक्षा ठेवणं पूर्ण चुकीचं आहे, असंही फडणवीस म्हणाले.
दरम्यान, आम्हाला महाराष्ट्राबद्दल आदर आहे. राज ठाकरेंच्या उद्दामपणाला आमचा विरोध आहे. मुंबईत उत्तर भारतीयांशी झालेल्या असभ्य वर्तनाबद्दल आधी माफी मागा, मग अयोध्येत या, मग स्वागत करू, असं खासदार ब्रिजभूषण सिंह म्हणालेत.
महत्त्वाच्या बातम्या-
“सुदैव आहे तुमचं की तुम्हाला तुरूंगात दणके बसले नाहीत, तुम्ही त्यातच खुशी माना”
मोठी बातमी! नवाब मलिक प्रकरणी एनआयएच्या तपासात अत्यंत धक्कादायक खुलासा
ह्युंदाईची जबरदस्त इलेक्ट्रिक कार लवकरच बाजारात येणार, पाहा लूक आणि फिचर्स
“राष्ट्रवादीने अनेक ठिकाणी आमच्या पाठीत खंजीर खुपसला, म्हणून…”