“…तर अजित दादांना फासावर लटकवाल का?”

मुंबई | अमरावतीच्या महापालिका आयुक्तांवर आमदार रवी राणा (ravi rana) यांच्या समर्थकांनी शाईफेक केल्यानंतर रवी राणा यांच्यावर 307 आणि 353चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज विधानसभेत (vidhansabha) याचे पडसाद उमटले. यावरून आमदार रवी राणांवर महाविकास आघाडी सरकार सुडापोटी कारवाई करत आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

अमरावतीमध्ये महापालिकेची परवानगी न घेता एक पुतळा बसवण्यात आला होता. तो हटवण्यात आला. या वादातून महापालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्यावर शाईफेक झाली. या प्रकरणात आमदार रवी राणा यांच्यावर 307 चा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला. याविरोधात राणा न्यायालयात गेले. त्यांना तात्काळ जामीन मंजूर करण्यात आला. मात्र आमदार राणांवर लावलेले कलम अतिशय गंभीर होते, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.

आमदार रवी राणांवर चुकीचे कलम लावल्याबद्दल विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आक्रमक झाले. ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन कार्यकर्त्यांनी चुकीचे काम केले म्हणून अजित दादांना फासावर लटकवाल का, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केलाय.

मूळ गुन्हेगारावर किरकोळ कलमे लावली. जो आमदार दिल्लीत त्याच्यावर 307 हे कलम कसे लागू शकते. अशा कारवाया केल्या, तर पोलीस बेछूट होतील. राज्यात काहीच उरणार नाही, असंही ते म्हणालेत.

दरम्यान,विधानसभेत रवी राणा यांनी त्यांच्यावरील गुन्ह्याची माहिती देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना अडवण्यात आलं. तेव्हा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ उभं राहून राणा यांची बाजू घेतली आणि राणा यांना बोलण्याची परवानगी देण्याची विनंती विधानसभा अध्यक्षांकडे केली. त्यानंतर रवी राणा यांनी संपूर्ण कहानी सभागृहात मांडली.

आज मला आर आर पाटलांची आठवण येते. त्यांच्या सारखा गृहमंत्री या राज्याला पाहिजे. तुम्ही वाझे सारखे क्रिमिनल अधिकारी निर्माण कराल तर तुमची अवस्था अनिल देशमुखांसारखी होईल. या माझ्या भावना नाहीये, संपूर्ण समाजाच्या भावना आहेत. गुन्हे दाखल करण्यासाठी तुम्ही फोन करता हे महाराष्ट्राचं दुर्देवं, असं रवी राणा यांनी म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या- 

‘…तर मी विधानसभेतच फाशी घेईल’; रवी राणा भडकले 

“ईडीची चिंता तुम्ही करू नका, तुमच्या खाजगी कार्यक्रमाची कधी CD निघाली तर…” 

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी; सरकार हा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत 

“बाळासाहेबांनतर हिंदूह्रदयसम्राट पदवी देवेंद्र फडणवीस साहेबांना द्यावी”

“काहींनी सांगितलं मी येणार मी येणार, पण आम्ही काय येऊन देतो का?”