“ठाकरे सरकारने 15 महिने टाईमपास केला, आम्ही ओबीसी आरक्षण मिळवून दिलं”

मुंबई | 2019 पासून आतापर्यंत सर्व निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय झाल्या. त्याचं हे पाप नेमकं कुणाचं आहे. ठाकरे सरकारने सुरुवातीचे 15 महिने केवळ टाईमपास केला. पण आमच्या सरकारने ओबीसी आरक्षण मिळवून दिलं, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.

देवेंद्र फडणवीस मुंबईत माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी ओबीसी आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली. तसेच महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडलं आहे.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारने कृतीतून उत्तर देवून इच्छाशक्ती दृढ असेल तर काय केलं जावू शकते हे ओबीसी आरक्षणा संदर्भात आम्ही दाखवून दिलं असतं. गोष्टी वेळ्यावर गेल्या असत्या तर 2020 मध्येच आरक्षण मिळालं असतं, असं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे.

13 डिसेंबर 2019 रोजी त्यावेळच्या उद्धव ठाकरे सरकारला सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की, डेडीकेड आयोग तयार करा, इम्पेरिकल डेटा गोळा करा, ट्रिपल टेस्ट पुर्ण करा, त्यानंतर तुम्ही आरक्षण लागू करा. पण सरकारने 15 महिने काहीच केलं नाही, असं फडणवीसांनी सांगितलं.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाबद्दल मोठा निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयात आज झालेल्या सुनावणीत राज्यात ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी मान्यता देण्यात आली आहे. पण काही तालुके वगळता हे आरक्षण लागू असेल अशी देखील माहिती समोर येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

नाना पटोलेंचा हॉटेलमधील ‘तो’ व्हिडीओ चित्रा वाघ यांनी केला शेअर! 

खासदार नवनीत राणा यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ!

सर्वात मोठी बातमी! ओबीसी आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निर्णय 

करिना कपूर खान तिसऱ्यांदा आई होणार?, स्वत:च केला खुलासा 

‘घोटाळे तुम्ही करायचे, लफडी तुम्ही करायची पण जेव्हा…’, खासदारांच्या बंडानंतर आदित्य ठाकरे संतापले