नागपूर | एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे हे भाजपचे पोपट आहेत. भाजपचा जीव त्या पोपटात अडकला आहे, असा टोला राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी लगावला. याला आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधताना हा टोला लगावला. राष्ट्रवादीचा पोपट रोज बोलत आहे ना? कोण कोणाचा पोपट आहे हे तुमच्यासाठी महत्त्वाचे असेल. आमच्यासाठी नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
नवाब मलिक दिवसभर काही तरी बोलत असतात. आता सध्या त्यांना दुसरं काही काम नाही. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक विधानावर प्रतिक्रिया देण्याची गरज नाही, असं सांगत फडणवीस यांनी मलिक यांच्या वक्तव्यावर बोलणं टाळलं.
मला विषयांतर करायचे नाही. हे जे काही पोपट आहे. त्याचा पोपट केल्यानंतर बरेच्या गोष्टी बाहेर येणार आहेत. हिवाळी अधिवेशनात अनेक मोठी नावे उघड होणार आहे, असं नवाब मलिक यांनी सांगितलं. पोपटाला वाचवण्यासाठी सर्व लोक पुढे पुढे पळत आहेत. पण विधानसभेत सर्व परिस्थिती समोर आल्यानंतर यांना महाराष्ट्राला तोंड दाखवता येणार नाही, तसे माझे प्रयत्न सुरू आहेत, असं नवाब मलिक म्हणाले होते.
दरम्यान, विधानसभा अधिवेशन वादळी ठरणार आहे. आता बोललो तर काही लोक कोर्ट कचेऱ्यात जातील. त्यामुळे विधानसभेत मी काही गोष्टी मांडणार आहे, असं नवाब मलिक म्हणालेत.
महत्वाच्या बातम्या-
‘हिवाळी अधिवेशनात अनेक नेत्यांची…’; नवाब मलिकांच्या वक्तव्याने खळबळ
“लाडक्या आर्यनला बेल मिळाल्यानं राष्ट्रवादी अन् शिवसेनेचा जीव भांड्यात पडला”
पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये ‘इतक्या’ रूपयांची वाढ, वाचा आजचा दर
काय सांगता! एका शहामृगाने लावली गाड्यांसोबत शर्यत, पाहा व्हायरल व्हिडीओ
आर्यन खानला अखेर जामीन मिळाला; उद्या तुरुंगातून बाहेर येणार?