संजय राऊतांचा ट्वीटमधून देवेंद्र फडणवीस निशाण्यावर!

मुंबई |  रविवारी विधानसभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगलीच शाब्दिक जुगलबंदी रंगली. काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर सरकार स्थापन केलेल्या शिवसेनेला फडणवीसांनी टोमणे मारले. आणि आज संजय राऊतांनी देखील ट्वीट करून फडणवीसांच्या टोमण्याला उत्तर दिलं आहे.

शेठ जिनके घर शीशे के होते हैं वो दुसरे कें घर पत्थर नहीं फेका करते, असं ट्वीट करत संजय राऊत यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे.

मी पुन्हा येईन या माजी मुख्यमंत्र्यांच्या टॅगलाईनची काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तर खिल्ली उडवलीच पण त्यांचे एकेकाळचे अतिशय जवळचे मित्र आणि महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही फडणवीसांची खिल्ली उडवण्याची संधी सोडली नाही. मी पुन्हा येईन, असं मी म्हटलं नव्हतं तरी मला यावं लागलं. महाराष्ट्राच्या जनतेने आणि त्यांच्या आशीर्वादाने मी आलो, असं उद्धव म्हणाले.

दरम्यान, संजय राऊत यांना आता भाजप काय उत्तर देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या-