“एखाद्याला मुलगा झाला तरी काही लोक त्याचं श्रेय घेतात”

मुंबई | सध्याच्या काळात आपण न केलेल्या कामाचेही श्रेय घेण्याचा काही लोकांनी सपाटा लावला आहे. कोणतंही काम आमच्याचमुळे झालं असल्याचा दावा केला जात आहे, असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

एखाद्याचं लग्न झालं किंवा एखाद्या व्यक्तीला मुलगा झाला तरी काही जण श्रेय घेतात. आमच्या प्रेरणेने त्यांना मुलगा झाल्याचं म्हणतात, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावलाय.

ठाण्यात सकल मराठा समाजाच्याने शिवजयंतीच्या कार्यक्रमाचं आयोजन केले होते. या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी त्यांनी कुणाचंही नाव न घेता हा टोला लगावला.

आमचा भगवा आठवण करून देतो त्यागाची. ज्या काळात महाराष्ट्रावर अत्याचाराची मालिका सुरू होती. त्या काळात एका क्रांतीचा जन्म झाला. ती क्रांती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांनी आठरपगड जातींना एकत्रित केलं. मावळ्यांची संख्या कमी होती. पण ते लाखांना भारी होते. या लढवय्या मावळ्यांना पाहून औरंगजेबही अचंबित झाला होता, असं ते म्हणाले.

शिवाजी महाराजांना परास्त का करू शकत नाही? असा सवाल त्यांनी केला होता. त्यावेळी, औरंगजेबाच्या दरबारींनी जे उत्तर दिलं ते थक्क करणारं होतं. आपलं सैन्य लढतं ते आपल्याकडे नोकर आहे म्हणून. शिवाजी महाराजांचे मावळे हे स्वत: करता लढत नाहीत. तर रयतेसाठी लढत असतात. त्यामुळेच ते आपल्याला पराजित करत असतात, असं ते म्हणाले.

जोपर्यंत मावळ्यांच्या रक्तात, विचारात आणि कृतीत शिवाजी आहे तोपर्यंत ते पराजित होऊ शकणार नाही, असं उत्तर औरंगजेबाला देण्यात आलं, असं फडणवीस यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या- 

“सत्तेत राहुनही काँग्रेसला कोणी विचारत नाही, सत्तेसाठी किती लाचारी स्वीकारणार?”

‘राजकारणात जो आपला विरोध करतो तो ही उद्या…’; राज्यपालांचं मोठं वक्तव्य 

“त्या काळात मावळा म्हणून जन्माला आलो असतो तर धन्य झालो असतो” 

धनंजय मुंडेंची बॅटिंग पाहिली का?, 157च्या स्ट्राईक रेटनं खेचल्यात धावा; पाहा व्हिडीओ

“शिवाजी महाराज आहे आमचा लाडका राजा, एप्रिलमध्ये वाजवून टाकू ठाकरे सरकारचा बाजा”