मुंबई | जे काही झालं ते वाहून गेलं. जेव्हा आपल्या पाठीत खंजीर खुपसला जातो तेव्हा राजकारणात जिवंत राहावं लागतं. त्यावेळी जे उचित वाटतं ते आम्ही केलं, असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
नकारात्मक सिद्धातांवरुन स्थापन झालेलं सरकार सकारात्मक काम करु शकत नाही. सरकार आहे पण शासन नाही, असं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडलं आहे.
गेल्या 2 वर्षात उल्लेखनीय असं कुठलंही काम सरकारने केलं नाही, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
2014 मध्ये राष्ट्रवादीसोबत जाण्याचा विषय नव्हता. आम्ही शिवसेनेसोबतच जाणार होतो. सुरुवातीला शिवसेनेने मुख्यमंत्रिपदाची मागणी केली होती. पण आम्ही 122 होतो. मग आवाजी मतदानानं सरकार स्थापन केलं. तेव्हा राष्ट्रवादीने जी भूमिका घेतली त्याचा आम्हाला फायदा झाला. पण आम्ही राष्ट्रवादीसोबत गेलो नव्हतो, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.
घरातून बाहेर पडायचं की नाही हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ठरवावं. सगळं घरात बसून होत असतं तर कुठेही जायची गरज भासली नसती. आम्ही कोरोना काळात प्रत्येक जिल्ह्यात, रुग्णालयात जात होतो. तिथली परिस्थिती मुख्यमंत्र्यांनी जाणून घेतली का?, असा सवाल त्यांनी केला आहे.
घरात बसून सगळं चांगले दिसतं. पण त्याचे समर्थन करु नका. कोरोना हा देशभरात होता. केंद्रानेही या काळात चांगलं काम केलं. समाजातील कुठल्याही घटकाला हे सरकार न्याय देऊ शकले नाही. केवळ कांगावा करण्यात 2 वर्ष घालवली, असा घणाघात देवेंद्र फडणवीसांनी केला आहे.
महाविकास आघाडीने काही माणसं ठेवली आहेत. जे रोज सकाळी उठून माध्यमात येऊन केंद्राकडे बोट दाखवत बसायचं हेच काम करत आहे, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
भाजप हा नंबर एकचा पक्ष बनला आहे- चंद्रकांत पाटील
‘आ देखें जरा किसमे कितना है दम’; नवाब मलिकांचं भाजपच्या ‘या’ नेत्याला ओपन चॅलेंज
पुढचे दोन दिवस राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता!
राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार का?; आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य
ट्विटरच्या सीईओपदी भारतीय वंशाचे पराग अग्रवाल!