“10 तारखेला महाविकास आघाडीच्या पत्त्याचा बंगला हलला, आता 20 तारखेला कोसळणार”

मुंबई | राज्यात विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

सर्वच पक्षांनी आपआपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवलं आहे. भाजपने त्यांच्या आमदारांना ताज हॉटेलमध्ये ठेवलं असून आज त्यांची बैठक पार पडली.

या बैठकीत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सर्व आमदारांचे अभिनंदन केले आहे. तसेच आमदारांशी बोलताना तुफान टोलेबाजी केली आहे.

राज्यसभेला तुम्ही केलेल्या मेहनतीमुळे महाविकास आघाडीचा पत्त्यांचा बंगला हलला. आता 20 तारखेला आपले पाचही उमेदवार निवडून आणल्यास महाविकास आघाडीचा पत्त्यांचा बंगला कोसळेल, असा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आहे.

राज्यसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीसांच्या रणनितीमुळे भाजपचा तिसरा उमेदवारही विजय झाला. असाच चमत्कार आता विधानपरिषदेच्या निवडणुकीतही दाखवावा लागणार आहे.

काही आमदार अजून मुंबईत पोहोचले नसून त्यांना लवकरात लवकर मुंबईत येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर रविवारी देवेंद्र फडणवीस सर्व आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत.

दरम्यान, देवेंद्र फडणवीसांची रणनिती आता विधानपरिषदेत कामी येणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

भाजपला धक्का देत ‘या’ बड्या नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

“अग्निपथ योजना म्हणजे सरकारचं दिशाहीन पाऊल”

‘हे बदल म्हणजे आभाळाला ठिगळ लावल्यासारखं’, रोहित पवारांची मोदी सरकारवर टीका

“नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासूनच विकासाला सुरूवात झाली”

अग्निपथ योजनेवरून संजय राऊत मोदी सरकारवर बरसले, म्हणाले…