उद्धव ठाकरेंनी वर्षा बंगला सोडताच सोशल मीडियावर देवेंद्र फडणवीस ट्रोल!

मुंबई | दोन दिवसांपासून शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी राजकीय वर्तुळात धुमाकूळ घातला आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी केलेल्या बंडाच्या राजकारणामुळे शिवसेनेसह महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.

बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांना भावनिक आवाहन केलं. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी वर्षा बंगला सोडला आणि ते मातोश्रीवर दाखल झाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जड अंत:करणाने कुटुंबासह वर्षा बंगला सोडला. जाताने त्यांनी वर्षा बंगल्यावरील आपल्या स्टाफचीही भेट घेतली. यावेळी कर्मचारी हात जोडून मुख्यमंत्र्यांसमोर उभे राहत होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वर्षा निवासस्थान सोडणार हे ऐकताच ‘वर्षा’ ते ‘मातोश्री’च्या दरम्यानच्या रस्त्यावर शिवसैनिकांनी एकच गर्दी केली. वर्षा बंगला उद्धव ठाकरेंनी सोडला मात्र सोशल मीडियावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेटकऱ्यांनी ट्रोल केल्याचं पाहायला मिळतंय.

सोशल मीडियावर उद्धव ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा बंगला सोडतानाचा फरक सांगण्यात येतोय. नेटकऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्या निर्णायाचं कौतुक करतानाच देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

भिंतीवर घाणेरडा मजकूर लिहून मुख्यमंत्री निवास सोडणारे, आणि फुलांची उधळण अंगावर झेलत वर्षा निवासस्थान सोडणारे उद्धव ठाकरे फरक नक्की आहे. उद्धव ठाकरे यांचं पुढं काय होईल नाही माहीत पण ते सध्या जनतेच्या मनातले मुख्यमंत्री मात्र आहेत, असं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

“आमचा विठ्ठल चांगला, अवतीभवतीच्या बडव्यांमुळे आमचा विठ्ठल बदनाम होतोय” 

मोठी बातमी! मुंबईत उद्धव ठाकरेंच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल 

“हे वादळ दोन दिवसात शांत होईल, सरकार पडणार नाही, आमदारही परत येतील” 

‘पक्ष वाचवण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणं अत्यावश्यक’, एकनाथ शिंदे मागणीवर ठाम 

‘संजय राऊत खुश कारण त्याला…’, नारायण राणेंची तुफान टोलेबाजी