मुंबई | भाजप पक्ष स्थापना दिननिमित्ताने (Bjp) मुंबईतील भाजपच्या मुख्यालयात कार्यक्रम पार पडला. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
येत्या काळात मोठा संघर्ष उभा करावा लागणारं आहे. दबावाला बिलकुल बळी पडू नका. मुंबईत आणि महाराष्ट्रात येत्या काळात एक नवा संघर्ष उभा करू. यांना सिंहासनावरून खाली खेचल्याशिवाय आपली लढाई ही थांबणार नाही. हाच विश्वास स्थापना दिनाच्या निमित्ताने उपस्थित करतो, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.
दबावाला बिलकुल बळी पडू नका. मुंबईत (mumbai) आणि महाराष्ट्रात येत्या काळात एक नवा संघर्ष उभा करू, असा निर्धारच फडणवीस यांनी केला आहे.
भाजपा हा विश्वातील मोठा पक्ष म्हणून नाव समोर आलं आहे. भाजप पक्ष संपवण्याकरता खूप प्रयत्न करण्यात आले. अनेक नेत्यांना आणीबाणी काळात 2-2 वर्ष जेल मध्ये ठेवण्यात आलं, असं फडणवीसांनी यावळी सांगितलं.
अमित शहा यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही जेव्हा 2 होतो तेव्हा आम्ही घाबरलो नाही आणि आणि 300 आहेत तर घाबरण्याचा प्रश्नच येत नाही, असंही फडणवीस म्हणाले.
माझा शिवसेनेला सवाल आहे कि तुम्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेसची कितवी टीम आहे. आपलं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं पाहायचं वाकून, अशी टीका त्यांनी आघाडीवर केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! कर्मचाऱ्यांसाठी रेल्वे मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
‘या’ 6 जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; वाचा हवामान खात्याचा अंदाज
मोठी बातमी! संजय राऊतांचा सोमय्यांवर अत्यंत गंभीर आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ
लेकीच्या जन्माचा आनंद गगनात मावेना; स्वगतासाठी बापाने हेलिकॉप्टर मागवला
आरबीआयचा ‘या’ 3 बँकांना झटका; केली मोठी कारवाई