मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण चांगलेचं तापलेलं आहे. राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. त्यातच आता राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस 1 मे महाराष्ट्र दिनीनिमित्त बुस्टर डोस सभा घेणार आहेत.
शिवसेनेसह विरोधकांना उत्तर देण्यासाठी भाजपकडून सभा आयोजित करण्यात आली आहे. बुस्टर डोस सभा यासाठी की, भाजपच्या कार्यकर्त्यांना बुस्टर आणि शिवसेनेसह महाविकास आघाडीला डोस, असं आशिष शेलारांनी म्हटलं आहे.
कडकडीत डोस असलेल्या अशा तडाखेबंद भाषणाचा कार्यक्रम देवेंद्र फडणवीसांच्या सभेने संपुर्ण महाराष्ट्र अनुभवेल, असं आशिष शेलार म्हणाले आहेत.
1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त भाजपच्या वतीने रंगारंग उच्च प्रतीच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. खरंतर कोरोनानंतर भाजपने एवढा मोठा आणि रंगाने भरलेल्या मुंबईकरांची संस्कृती सांगणाऱ्या सोहळ्याचे आयोजन केले आहे.
या कार्यक्रमाने मुंबईतील शक्ती केंद्र आणि बुथ प्रमुख रूपाने हजारो कार्यकर्ते मुंबईतील सोमय्या मैदानावर आनंदात सहभागी होणार आहेत, असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये मेट्रो कारशेडच्या पत्र्याच्या मागं लपून एक दोन लोक एकत्र येऊन दगडं मारण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपच्या पोलखोल सभेला घाबरून हे कृत्य केलं आहे, अशी टीका आशिष शेलारांनी केली आहे.
शिवसेनेचे कर्मकांड आम्ही जनतेसमोर आणले आहे. काही लोक 14 मे रोजी सभा घेणार आहेत. तर कोणी 1 मे रोजी सभा घेणार आहेत. भाजपची 1 मे रोजीची पोलखोल सभा सर्वांत मोठी असणार आहे, असं आशिष शेलारांनी सांगितलं.
दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकांची राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. शिवसेना आणि भाजपने मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. त्यातच आता शिवसेनेची पोलखोल करण्याचा इशारा आशिष शेलारांनी दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
असुरक्षित SEX मुळे झाले वांदे! कोरोना काळात तब्बल 85 हजारहून अधिक लोकांना HIV ची बाधा
हनिमूनला असं काही घडलं की नवरदेवाला घामच फुटला; बेडवर बसलेल्या नवरीचा पदर उचलला अन्…
रिलायन्स इंडस्ट्रीजची ऐतिहासिक वाटचाल; शेअर्स विक्रमी स्तरावर, देशातील पहिली कंपनी बनली
हाय रे गर्मी! देशातील 5 राज्यांना तीव्र उष्णतेचा इशारा; वाचा हवामान खात्याचा अंदाज
राणा दाम्पत्याच्या अडचणी वाढणार, शिवसेना व्हिडीओ बाॅम्ब फोडणार; राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा