विधानपरिषदेच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई | पाचव्या उमेदवारासाठी एकही मत नव्हतं. तरीही आमचे पाचवे उमेदवार प्रसाद लाड विजयी झाले, अशी प्रतिक्रिया महाविकास आघाडीला अस्मान दाखवल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

दिवसभर विधिमंडळात बसलेल्या फडणवीसांनी विजयी उमेदवारांची घोषणा होताच विधिमंडळाबाहेर येऊन पत्रकारांशी संवाद साधला.

ही परिवर्तनाची सुरुवात आहे, जोपर्यंत महाराष्ट्रात लोकाभिमुख सरकार येत नाही, तोपर्यंत संघर्ष सुरु राहील, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

चमत्कार वगैरे मी मानत नाही, असंतोष मतांमध्ये परावर्तित झालेला आहे. असंतोष वाढत राहिला तर काय होईल, याचा विचार करावा. पक्षांच्या आमदारांचं आणि अपक्ष आमदारांचं आभार मानतो. आमचा संघर्ष सत्तेसाठी नाही आमचा संघर्ष जनतेसाठी आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

महाविकास आघाडी सरकार विरोधात आमचा संघर्ष सुरुच राहील. लोकाभिमुख सरकार आणत नाही तोपर्यंत आम्ही लढू, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. देशात मोदींची लाट आहे. महाराष्ट्र देखील मोदींच्या पाठिशी आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

महाविकास आघाडीवर आमदार नाराज आहेत. पाचव्या उमेदवारासाठी एकही मत नव्हतं. तरीही आमचे पाचवे उमेदवार प्रसाद लाड विजयी झाले. आमचे सहकारी लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक अत्यंत अडचणी असून देखील ते इथं आले आणि विजयाला हातभार लावला, असं त्यांनी म्हटलंय.

महत्त्वाच्या बातम्या- 

मोठी बातमी! शिवसेना राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार विजयी, भाजप आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर 

सोनिया गांधींना रूग्णालयातून डिस्चार्ज, ‘या’ तारखेला ईडीसमोर हजेरी लावणार

अखेर मतमोजणीला सुरूवात, थोड्याच वेळात निकाल समोर येणार

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना कोरोनाची लागण

मोठी बातमी! काँग्रेसचा आक्षेप निवडणूक आयोगाने फेटाळला