Rajyasabha Election Result | तिन्ही उमेदवार विजयी होताच देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई | राज्यसभा निवडणुकीत भाजपचे तिन्ही उमेदवार विजयी झाली. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारसोबत असलेल्या आमदारांपैकी काही आमदारांना फोडण्यात भाजपला यश आलं आहे.

महाविकास आघाडीचे संजय राऊत, प्रफुल्ल पटेल आणि इम्रान प्रतापगढी हे तिन्ही उमेदवार विजयी झाले. तर भाजपचे पीयूष गोयल आणि अनिल बोंडे हे विजयी झाले. तर सहाव्या जागेसाठी धनंजय महाडीक आणि संजय पवार यांच्यात चुरस होती. दुसऱ्या पसंतीक्रमाच्या मतमोजणीत धनंजय महाडीक यांनी बाजी मारली. तर संजय पवार यांना पराभवाचा धक्का बसला.

निकाल हाती आल्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विजयाबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे.

महाडीक यांच्या विजयानंतर किंगमेकर ठरलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ट्विट केले. निवडणूक केवळ लढवण्यासाठी नाही, तर जिंकण्यासाठी लढवली होती, असं फडणवीस म्हणाले.

आमच्या सगळ्यांकरता हा अतिशय आनंदाचा क्षण आहे. भाजपचे तिन्ही उमेदवार याठिकाणी विजयी झाले आहेत. सगळ्यात आधी हा विजय आहे तो मी आमचे लढवय्ये आमदार लक्ष्मण जगताप यांना आणि मुक्ता टिळक यांना समर्पित करतो, असं फडणवीसांनी म्हटलं आहे.

दरम्यान, भाजपचे तिन्ही उमेदवार विजयी झाल्यानंतर भाजप नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विधानभवन परिसरात जल्लोष केला. विजयी जल्लोष करताना त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

महत्त्वाच्या बातम्या- 

Rajya Sabha Election Result | अखेर निकाल लागला; संजय राऊतांसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी 

“ईडीचा डाव फसला, आता रडीचा डाव सुरू झाला, तरी आम्हीच जिंकू”

Rajyasabha Election | सर्वात मोठी बातमी; राज्यसभा निवडणुकीत मोठा ट्विस्ट 

“चंद्रकांत पाटलांनी हिमालयात जाऊन डोक्याला तेल लावावं आणि…” 

Rajyasabha Election | गुलाल आम्हीच उधळणार- उद्धव ठाकरे