शेजाऱ्याच्या घरी मुलगा झाला, म्हणून पेढे वाटू नका – देवेंद्र फडणवीस

मुंबई | विदर्भापासून भाजपच्या पराभवाची सुरुवात झाली आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली होती. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं असून ‘शेजाऱ्याच्या घरी मुलगा झाला, म्हणून पेढे वाटू नये,’ असा टोला लगावला आहे.

जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये बालेकिल्ला असलेल्या नागपूरमध्ये भाजपला धक्का बसला आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. यावर निवडणुकीत आम्हीच एक क्रमांकाचा पक्ष ठरलो आहोत, असं फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे.

जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजप हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला असून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेपेक्षा आमची कामगिरी चांगली आहे. सहा जिल्ह्यांच्या पंचायत समितींच्या निवडणुकीत भाजपने 194 जागांवर विजय मिळवला आहे. तर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत 106 जागांवर भाजपचा विजय झाला आहे, असं फडणवीसांनी सांगितलं.

दरम्यान, निकालानंतर प्रदेश भाजप कार्यालयात दिवसभर विविध विषयांवर चिंतन बैठकांचे सत्र सुरू होते. मात्र निकालांचा या बैठकांशी संबंध नसून संघटनात्मक तयारी व पक्षांतर्गत निवडणुकांसाठी या बैठका होत्या, असे फडणवीस यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-