सरकार बदललं की, आधीच्या सरकारच्या चौकशीचं राजकारण सुरु होतंच- फडणवीस

मुंबई | इतिहास हेच सांगतो की, राज्य सरकार बदललं की, जुन्या सरकारसंबंधीचे निर्णय आणि प्रकरणं चर्चेत येतात. मग चौकशीचं राजकारण सुरु होतं, असं माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

भीमा कोरेगाव तपासाची चौकशी आणि नेत्यांच्या फोन टॅपिंगच्या चौकशीवरुन राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं आहे.

या प्रकरणात महाराष्ट्र पोलिसांनी उत्तम तपास केला आहे. सर्वोच्च न्यायालयात धाव तेव्हा पोलिसांच्या बाजूने निकाल लागला. पण काही लोक निवडणुकीच्या राजकारणासाठी पोलिसांचंच मनोधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न करत होते. हा तपास आता NIA कडे गेला हे बरं झालं, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

दरम्यान, भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषदेवरुन राजकारणाला नवं वळण लागण्याची चिन्हं आहेत. NIAनं या तपासासंदर्भात पुण्याच्या सत्र न्यायालयात धाव घेऊन याबद्दलची कागदपत्रं, आरोपींचा ताबा त्यांना देण्यात यावी असं म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या- 

-केंद्र सरकारने SC आणि OBC बजेट एकत्र सादर करून या समूहात भांडण लावण्याचं काम केलं- प्रकाश आंबेडकर

-फडणवीस सरकारने रेडिओ व टीव्ही वाहिन्यांवर केलेल्या जाहिरातीचे धक्कादायक आकडे उघड

-सर्वसामान्यांना केवळ स्वप्नांच्या दुनियेत रमायला लावणारा अर्थसंकल्प- मुख्यमंत्री.

-अर्थमंत्र्यांचं 162 मिनिटांचं भाषण… गुंतवणूकदारांना 4 लाख कोटी रूपयांचा झटका!.

-‘या देशात फक्त हिंदूंची चालणार’; शाहीनबागमध्ये गोळीबार करणाऱ्या तरुणाचं वक्तव्य