मुंबई | वॉटरग्रीड सारख्या महत्वाकांक्षी प्रकल्पाला 20000 कोटी ऐवजी फक्त 200 कोटी रुपये देऊन या सरकारने फक्त टॅंकर माफियाला प्राधान्य व प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे, असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारच्या अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली आहे.
अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी विधीमंडळात महाविकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प मांडला. यावेळी त्यांनी मराठवाड्यासाठी मोठी घोषणा केली. मराठवाडा वॉटर ग्रीड योजना सुरु राहणार असून त्यासाठी 200 कोटी निधी देणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
देवेंद्र फडणवीसांनी यावरुन सरकारवर टीका केली आहे. मराठवाडा महाराष्ट्रात येतो याचा सरकारला विसर पडला आहे का? वाॅटरग्रीडसाठी केवळ 200 कोटी रुपये देऊन मराठवाड्याची चेष्टा केली आहे, असं ते म्हणाले आहेत.
दरम्यान, मराठवाडा वाॅटर ग्रीड योजना बंद करण्याचे संकेत यापूर्वी अजित पवार यांनी दिले होते. त्यामुळे वाॅटर ग्रीड योजनेपासून मराठवाडा वंचित राहतो की काय अशी शक्यता निर्माण झाली होती.
महत्वाच्या बातम्या-
-“अरे बाबांनो, मी अन् मुख्यमंत्री शब्दांचे पक्के आहोत विरोधकांसारखा आम्ही शब्दांचा खेळ करत नाही”
-उद्धव ठाकरे आज करणार रामजन्मभूमीत प्रवेश; असा असणार अयोध्या दौरा
-नाथाभाऊंची नाराजी दूर करण्यासाठी भाजप घेणार ‘हा’ मोठा निर्णय
-अखेर ग्रामपंचायत सदस्यामधूनच होणार सरपंचाची निवड; राज्यपालांनी केली स्वाक्षरी
सिनेविश्वातला जातीयवाद आताचा नाही… त्यासाठी काही माणसं कार्यरत- विक्रम गोखले