खेळ महाराष्ट्र मुंबई

इंग्लंड क्रिकेट संघाला शुभेच्छा देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मोठी चूक

मुंबई | 2019च्या क्रिकेट विश्वचषकावर इंग्लंडच्या संघानं आपलं नाव कोरलं आहे. विजयी संघाला शुभेच्छा देताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मोठी चूक झाली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरुन इंग्लंडच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र यावेळी इंग्लंड क्रिकेट संघाला ट्विटमध्ये टॅग करण्याऐवजी त्यांनी चुकून इंग्लंड फुटबाॅल संघाला टॅग केलं आहे.

@England या ट्विटर हॅंडलला मुख्यमंत्र्यांनी टॅग केलं आहे, मात्र ते फुटबाॅल संघाचे ट्विटर हॅंडल असून @englandcricket हे इंग्लंडच्या क्रिकेट संघाचे अधिकृत ट्विटर हॅंडल आहे.

मराठी नेटकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची ट्वीट करतानाच्या चुकीचा मुद्दा चांगलाच उचलून धरला आहे. मुख्यमंत्र्यांच्या ट्वीटला रिट्वीट करत ट्रोलर्सने त्यांना त्यांची चूक लक्षात आणून दिली. 

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी केलेली चूक लक्षात येताच मराठी ट्विटर यूझर्सनी त्यांना चांगलंच ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

 

 

IMPIMP