मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या महाजनादेश यात्रेवर आहेत. वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात यात्रेदरम्यान शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनी जागावाटपाचं ठरलं असल्याचं सांगितलं आहे.
भाजपने जिंकलेल्या 122 आणि शिवसेनेने जिंकलेल्या 63 जागा त्या-त्या पक्षाकडेच राहतील. उर्वरित जागांवर फिफ्टी-फिफ्टी होईल, असे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
उर्वरित 103 जागांचे वाटप हे युतीमध्ये होऊ शकते. पण युतीतील लहान मित्रपक्षांना भाजपच्या कोट्यातूनच जागा द्याव्या लागतील, त्यामुळं आमदारांव्यतिरिक्तच्या भाजपच्या वाट्याला तुलनेने कमीच जागा येतील, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.
आमचं सगळं ठरलंय पण काय ठरलंय ते माध्यमांना योग्य वेळ आल्यावर सांगायचं हेही ठरलं आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.
स्वत:च्या सोईनुसार मित्रपक्षांना सोबत घ्यायचे वा टाकून द्यायचे हे भाजपे संस्कार नाही. राजकारणात मित्र रोज बदलता येत नसतात, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.
राज्याच्या विकासाच्या अजेंड्यावर मतभेद असता कामा नयेत, असे निर्देश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे त्यांच्या पक्षात देतील, असा माझा विश्वास आहे, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-उपमुख्यमंत्रीपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट!
-राष्ट्रवादीची भाकरी करपण्यासाठी स्वत: शरद पवार जबाबदार- विनायक मेटे
-चंद्रकांत पाटील यांच्या मुख्यमंत्री होण्याच्या इच्छेवर देवेंद्र फडणवीस म्हणतात…
-विधानसभेसाठी पंकजा मुंडेंविरोधात धनंजय मुंडेंनी खास प्लॅन आखला! यशस्वी होणार??