मुंबई : ज्यांचं नेतृत्व महाराष्ट्राने नाकारलं, त्यांच्यावर सूड घेऊन कोणता लाभ आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या झालेल्या ईडीकडून चौकशी प्रकरणी टोला लगावला आहे. कोहिनूर मिल व्यवहार प्रकरणी राज ठाकरे यांची अंमलबजावणी संचालनालयाकडून गुरुवारी नऊ तास चौकशी करण्यात आली होती.
गेल्या पाच वर्षात त्यांचा पक्ष संपत गेला. आधी गेल्या 2014च्या लोकसभेत काहीच नाही, मग 2014च्या विधानसभेत त्यांची एक जागा आली, तोही आमदार शिवसेनेत गेला. महापालिकेत नाशिक त्यांच्याकडे होती, तिथेही दोघेच जण निवडून आले. इतर कुठल्याही महापालिकेत त्यांची लोकं निवडून आली नाहीत. जिल्हा परिषदेत कोणी आलं नाही, नगरपालिकेत कोणी आलं नाही, असा पाढा मुख्यमंत्री म्हणाले आहेत.
या लोकसभेत इतकी टोकाची भूमिका राज ठाकरेंनी घेतली. स्टार प्रचारक बनले. वाटेल तसं बोलले. कुठल्याही स्तरावर जाऊन बोलले. तरी देखील त्यांना काहीच प्रतिसाद मिळाला नाही. मग ज्यांचं नेतृत्व महाराष्ट्राने नाकारलं आहे. ज्यांच्या नेतृत्वाला कोणीही समर्थन द्यायला तयार नाही. त्यांच्याविरुद्ध सूडबुद्धीने कारवाई करुन आम्हाला कोणता लाभ आहे?, असंही मुख्यमंत्री म्हणाले आहेत.
मी प्रॅक्टिकल विषय सांगतो. म्हणजे आम्ही लाभ असला, तरी करणार नाही. पण सांगा आम्हाला काय लाभ आहे? असा प्रतिप्रश्न देवेंद्र फडणवीसांनी विचारला.
महत्वाच्या बातम्या-
-“तुम्ही कितीही चौकशी करा, माझं तोंड मी बंद करणार नाही”
-…मग मी बोलले तर कुठे बिघडलं- अंजली दमानिया
-अजित पवारांसह या मोठ्या नेत्यांच्या अडचणीत वाढ; कोर्टाचे गुन्हा दाखल करण्याचे आदेश
-एनएसयूआयच्या विद्यर्थ्यांनी सावरकरांच्या पुतळ्याला घातला चपलेचा हार
-नक्की काय आहे ‘मिशन टेस्ट वर्ल्ड कप’???