“देवेंद्रजी, तुम्ही थोडं अडजेस्ट केलं तर….”; काॅंग्रेसचा घणाघात

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची काल गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर वादळी सभा झाली. या सभेत त्यांनी महाविकास आघाडी सरकारला लक्ष केलेलं पहायला मिळालं.

राज ठाकरे हे योग्यच बोलले होते. भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला. शिवसेनेच्या सुद्धा चांगल्या जागा आल्या होत्या, असं फडणवीसांनी म्हटलं.

सत्तास्थापन करत असताना शिवसेनेनं पाठीत खंजीर खुपसला आणि तीन पक्ष एकत्र येऊन कपटाने सरकार स्थापन केलं, असा टोला फडणवीसांनी लगावला आङे.

देवेंद्र फडणवीसांच्या टोलेबाजीवर काँग्रेसचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्रजी, आमच्या महाविकास आघाडीचं काम चागलं चाललंय. तुम्ही थोडं अडजेस्ट केलं तर अजून चांगलं काम चालेल, असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.

काँग्रेस नेते सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर आले होते. यवतमाळमधील कार्यक्रमात अशोक चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.

देशाची लोकशाही बळकट करण्यासाठी देशाचं वातावरण बदलण्याची गरज आहे. दोन्हीकडून अर्थात सत्ताधारी आणि विरोधकांच्या बाजूने वातावरण बदलण्याची गरज आहे, असंही चव्हा म्हणाले.

आम्ही रोज बोलतो. राज्यात जो पॉलिटिकल वॉर ( war ) चालला तो गँगवार होऊ देऊ नका. दोन्हीकडून होऊ नये याची काळजी घेण्याची गरज आहे, असा इशाराही चव्हाणांनी दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  “पहिल्यांदा तुमचा मुलगा अमित ठाकरे यांना हनुमान चालिसा म्हणायला लावा”

  Corona Update: ‘या’ ठिकाणी कोरोनाच्या रुग्णसंख्येत दुपटीनं वाढ

  “राज ठाकरेंच्या तुंबलेल्या मोरीतून भाजपचे गांडूळ निघाले”

  “राज ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर मी 200 टक्के सहमत” 

  एसटी कर्मचाऱ्यांना अजित पवारांचं पुन्हा आवाहन, म्हणाले…