मुंबई | 2014 मध्ये सेना-भाजपची युती महाराष्ट्रात सत्तेवर आली. त्यानंतर वेळोवेळी सेना भाजपमध्ये संघर्ष पहायला मिळत होता. मागील मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत या दोन्ही सत्ताधारी पक्षातील वाद प्रकर्षाने समोर आला होता. दोन्ही पक्षांंनी एकमेकांविरूद्ध दंड थोपटले होते.
त्यानंतर दोन्ही पक्ष मुंबई महापालिकेत सत्तेवर आले. 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला जबरदस्त धक्का देत महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं आणि त्यावेळी खऱ्या अर्थाने सेना- भाजप युतीचा शेवट झाला.
भाजपने शब्द पाळला नाही त्यामुळे राज्यात युतीच सरकार आलं नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वारंवार बोलून दाखवलं आहे. त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या राजकीय मैत्रीत दुरावा निर्माण झाला होता. वेळोवेळी हे प्रकर्षाने दिसून देखील आलं आहे.
अशातच आता उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर देवेंद्र फडणवीसांना चिमटे काढल्याचं पहायला मिळालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंढरपूर पालखी महामार्गाचे उद्घाटन केलं. त्यावेळी बोलताना नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात जुगलबंदी पहायला मिळाली.
पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणाची सुरूवात मराठीतून केली. त्यावेळी संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर आणि पंढरपूर इत्यादी विषयावर पंतप्रधान मोदी बोलले. भाषणावेळी नरेंद्र मोदींनी उपस्थित असलेल्या सर्वांची नावं घेतली. त्यावेळी त्यांनी माझे मित्र देवेंद्र फडणवीस यांचं असं नाव घेतलं.
देवेंद्र फडणवीसांचं नाव माझे मित्र आणि इतरांचे नाव पदानुसार घेतल्याने उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणादरम्यान याचा विशेष उल्लेख केला. उद्धव ठाकरे यांनी भाषणाची सुरूवात केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचं नाव घेयचे विसरले.
त्यावेळी त्यांनी साॅरी देवेंद्रजी, तुमचं नाव घेयचं विसरलो, असं उद्धव ठाकरे म्हणाले. महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते आणि आमचे सहकारी देवेंद्र फडणवीस असं म्हणत उद्धव ठाकरेंनी बोलण्यास सुरूवात केली.
भाषणादरम्यान, त्यांनी मोदींच्या भाषणाचा उल्लेख केला. माझे मित्र देवेंद्र फडणवीस, असा उल्लेख केला. त्यामुळे देवेंद्र फडणवीस मोदींच्या किती जवळचे आहेत, हे त्यांनी दाखवून दिलंय, असा चिमटा उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना काढला आहे.
महाराष्ट्राच्या भूमीने अनेक वीर दिले. पंढरपूरने मानवतेला केवळ भक्ती नाही तर देशभक्तीचा मार्गही दाखवला. विठुमाऊलीच्या दर्शनानं डोळ्याचे पारणे फिटतात, असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले आहेत.
दरम्यान, देवेंद्र फडणवीसाचं दिल्लीत वजन आहे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी मागे लगावला होता. त्यामुळे त्याच्या आजच्या वक्त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“…त्यामुळे नरेंद्र मोदींना देशाची माफी मागावी”
जळगावात राष्ट्रवादीला खिंडार! खडसेंना धक्का देत गिरीश महाजनांचा मास्टरस्ट्रोक
“देशापेक्षा आयपीएल गरजेची वाटणाऱ्यांबद्दल काय बोलावं”
वाढदिवसाला हारतुरे केक नको, पुण्यात रक्ताचा तुटवडा, रक्तदान करा- मुरलीधर मोहोळ
महाराष्ट्रात पेट्रोल स्वस्त होण्याची शक्यता, ठाकरे सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत