…तर मनमोहन सिंगांनी पाकिस्तानवर हल्ला केला असता; ब्रिटनच्या माजी पंतप्रधानांचा गौप्यस्फोट!

लंडन : भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या तणाव आहे. काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर या तणावात भर पडल्याचं दिसत आहे. पाकिस्तानचे नेते रोज भारताला युद्धाची धमकी देत आहेत. मात्र केंद्र सरकार पाकिस्तानच्या धमक्यांना भीक घालत नाहीेये. अशा पार्श्वभूमिवर ब्रिटनचे माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमरून यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.

मुंबईवर झालेला 26/11सारखा हल्ला जर पुन्हा झाला असता तर तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग हे पाकिस्तानवर लष्करी कारवाई करण्याच्या विचारात होते, असं कॅमरून यांनी आपल्या आत्मचरित्रात म्हटलं आहे.

डेव्हिड कॅमरून हे 2010 ते 2016 या काळात ब्रिटनचे पंतप्रधान होते. त्याकाळात त्यांनी दोनवेळा भारतला भेटही दिली होती आणि जगातल्या विविध व्यासपीठांवर ते पंतप्रधान मनमोहन सिंग यांना भेटलेही होते. त्यांच्याशी झालेल्या संवादावरून त्यांनी हे मत व्यक्त केलंय.

डेव्हिड कॅमरून यांनी मनमोहन सिंग यांच्या अनेक आठवणीही आपल्या आत्मचरित्रात सांगितल्या आहेत. कॅमरून यांनी मनमोहन सिंग यांचा उल्लेख अतिशय सभ्य असा संत माणून म्हणून केलाय.

दरम्यान, मनमोहन सिंग हे जेवढे मृदू आहेत तेव्हढेच ते कठोरही होवू शकतात ,असं मतही डेव्हिड कॅमरून यांनी व्यक्त केलं.

महत्वाच्या बातम्या-