धैर्यशील माने यांची पूरग्रस्तांना मदत; उचलली पाठीवर पोती

कोल्हापूर : कोल्हापूर, सांगलीतील पूरपरिस्थितीमुळे तेथील लोकांच्या मदतीला अनेकांचे हातपुढे सरसावत आहेत. अनेक लोक पुढे येऊन मदत करत आहेत. त्यातीलच एक नाव म्हणजे हातकणंगलेचे शिवसेना खासदार धैर्यशील माने हे आहेत. माने स्वत: पुढे येऊन ट्रकमधील सामान आपल्या खांद्यावरुन उचलून नेत असल्याचे फोटोसमोर सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. धैर्यशील माने मागील पाच-सहा दिवसांपासून आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत पूरग्रस्तांची मदत करत आहेत.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी कोल्हापुरातील शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांसाठी नवीन कपडे, तांदूळ-डाळ असे खाद्यपदार्थ, जीवनावश्यक वस्तू पूरग्रस्तांसाठी पाठवलं आहे.

आमदार एकनाथ शिंदे आणि मुंबईतील शिवसैनिक दहा ट्रक घेऊन शिरोळ तालुक्यात गेले. त्यानंतर खासदार धैर्यशील माने यांनी सर्वांच्याबरोबर प्रत्येक ट्रकमधील साहित्य स्वतः उतरुन घेताना पाहायला मिळाले. 

पूरग्रस्तांना जेवण पुरवलं जात असतानाच धैर्यशील माने यांनी जनावरांचीही काळजी घेतली. पूरग्रस्त भागातील जनावरांना चारा, खाद्य मिळेल याकडे धैर्यशील माने यांनी लक्ष पुरवलं होतं. 

दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगलीमध्ये पूरस्थिती सुधारत असताना येत्या दोन दिवसात मुसळधार पाऊस होणार असल्याचा इशारा पुणे वेधशाळेने दिला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-ऑलिम्पिक पात्र खेळाडूंना 50 लाखांचं अर्थसहाय्य- आशिष शेलार

-सावत्र वडिलांनी केलेल्या छळानंतर श्वेता तिवारीची मुलगी म्हणते…

-“मी विमान पाठवतो, तुम्ही स्वत: या आणि काश्मीरमधील परिस्थिती बघा”

-बालपणापासूनच्या ते गेल्या 18 वर्षापर्यंत मोदींनी सांगितल्या ‘या’ सगळ्या गोष्टी

-कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात येत्या दोन दिवसात मुसळधार पावसाचा इशारा