महाराष्ट्र मुंबई

अखेर हुकुमशाहीचा उदय झालाच; धनंजय मुंडेंचं भाजपवर टीकास्त्र

मुंबई : कर्नाटकमधील कुमारस्वामींचं सरकार बहुमत चाचणीत अपयशी ठरलं. कर्नाटकमध्ये काँग्रेस-जेडीएसला मोठा धक्का बसला आहे. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधींनी भाजपवर निशाणा साधला.

विधानसभेत बहुमत प्राप्त करण्यात मुख्यमंत्री कुमारस्वामी अपयशी ठरले. त्याबाबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंनय मुंडे यांनीही ट्वीटकरुन भाजपवर टीका केली आहे.

अखेर हुकुमशाहीचा उदय झालाच! साम दाम दंड भेद सर्व गोष्टी एकत्र करत भाजपने कर्नाटक सरकार पाडलेच, असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे. 

बहुमताच्या जोरावर आता कोणतेही निर्णय घेतले जात आहेत. आम्हाला जी भिती होती ती आता सत्यात उतरत आहे, असंही धनंजय मुंडे म्हणाले आहेत.

राहुल गांधींनी जे लोक आघाडीच्या सत्तेला एक धोका आणि अडथळ्याच्या रुपात पाहत होते. त्यांच्या लालचीपणाचा आता विजय झाला. हा प्रामाणिकपणा, लोकशाही आणि कर्नाटकच्या जनतेचा पराभव आहे, असा आरोप धनंजय मुंडेंनी भाजपवर केला आहे.

प्रत्येक गोष्ट विकत घेता येत नाही हे भाजपला एक दिवस कळेल, अशा आशयाचं ट्वीट करत प्रियांका गांधींनीही भाजपला धारेवर धरलं आहे. 

 

महत्वाच्या बातम्या-

-मराठा मोर्चाचं राजकारण करणाऱ्याला धडा शिकवू; निवडणूक लढण्यावरुन मोर्चात वाद

“एक दिवशी भाजपला कळेल प्रत्येक गोष्ट विकत घेता येत नाही”

-निवडकर्त्यांचं काम लोकांना खूश करणं नाही- सौरभ गांगुली

-काँग्रेससोबत आघाडीसाठी तयार पण…; प्रकाश आंबेडकरांनी घातली ‘ही’ अट!

-आदित्य ठाकरेंमध्ये शिवाजी महाराजांची झलक पाहणारा विद्यार्थी नव्हे तर शिवसैनिक!

IMPIMP