“भाजपची महाजनादेश यात्रा ही ‘चालू’ मुख्यमंत्र्यांची ‘चालू’ यात्रा”

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘शिवस्वराज्य यात्रे’ची सुरवात आज जुन्नरपासून झाली आहे. यात्रेदरम्यान विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

भाजपची ‘महाजनादेश यात्रा’ ही ‘चालू’ मुख्यमंत्र्यांची ‘चालू’ यात्रा आहे. मुळात ही महा’धना’देश यात्रा आहे, असं म्हणत धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या यात्रेवर हल्लाबोल केला आहे.

मीच मुख्यमंत्री होणार हे मिरवण्यासाठी ‘महाजनादेश यात्रा’ आहे. आदित्य ठाकरेंची मीच मुख्यमंत्री होणार हे सांगण्यासाठी ‘जनाशिर्वाद यात्रा’ आहे. तर आपली ‘शिवस्वराज्य यात्रा’ ही जनतेच्या हितासाठी असल्याचं धनंजय मुंडेंनी सांगितलं आहे.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा या सरकारने नेहमीच अपमान केला आहे, असा आरोपही धनंजय मुंडे यांनी सत्ताधाऱ्यांवर केला आहेे. 

छत्रपती स्मारकाची एक वीटही अदयाप रचलेली नाही. त्यांच्या नावाने जाहीर केलेली कर्जमाफीदेखील फसवी निघाली. जुन्नरकर हा अपमान कधीच विसरणार नाहीत, असंही ते म्हणाले आहेत. 

72 हजार नोकऱ्यांची मेगाभरती करु अशी घोणषा केली मात्र तुम्ही तुमच्या पक्षातंच मेगाभरती सुरु केली आहे. भाजपमुळे राजकारणात गुन्हेगारीकरण वाढत आहे, असा आरोपही धनंजय मुंडेंनी भाजपवर केला आहे. 

महत्वाच्या बातम्या-

-काश्मीरबाबत बेजबाबदार वक्तव्य; गौतमने केली शाहीदची कानउघडणी

-भाऊ कदम आता नव्या रंगात अन् नव्या ढंगात येणार तुमच्या समोर!

-…हा तर सत्तेचा गैरवापर; राहुल गांधींची सरकारवर टीका

-अनाजीपंतानं उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंमध्ये फूट पाडली- छगन भुजबळ

-कलम 370च्या निर्णयानंतर आता बेळगाव महाराष्ट्राला द्या- नितेश राणे