नरेंद्र मोदींना पाकिस्तानचा कांदा, साखर कशी चालते? – धनंजय मुंडे

नांदेड : फक्त मतांसाठी पाकिस्तानविरुद्ध बोलणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं देशप्रेम बेगडी असून त्यांना त्यांच्या सरकारने पाकिस्तानमधुन आणलेला कांदा आणि साखर कशी चालते? नवाज शरीफच्या वाढदिवसाचा केक कसा चालतो? असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.

पंतप्रधान मोदी यांना नाशिकमधील कांदा उत्पादक आणि देशातील साखर उत्पादक शेतकऱ्यांपेक्षा पाकिस्तानच्या शेतकऱ्यांची अधिक काळजी आणि प्रेम असावं हेच त्यांचं देशप्रेम असावं असा टोलाही धनंजय मुंडेंनी यावेळी लगावला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत नांदेड, वसमत, परभणी येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. त

तब्बल अडीच हजारहून अधिक पोलीस, सामान्य कार्यकर्त्यांची धरपकड, काळ्या कपड्यास बंदी, कांद्यास, शेतमालास, पिशव्या या सर्वांवर बंदी छावणीचे स्वरूप आले आहे नाशिकला आणि म्हणे सर्वात मोठ्या लोकशाही देशातील पंतप्रधानांचा दौरा आहे, असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

मोदी साहेब मानलं तुमच्या निधड्या छातीला अशी उपरोधात्मक टीका त्यांनी यावेळी केली. तसेच तुमच्यात हिंमत असेल तर पोलिसांशिवाय तुमची महाजनादेश यात्रा काढून दाखवा, असं आव्हान विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं.

महत्वाच्या बातम्या-