महाराष्ट्र मुंबई

‘बाजी पलटने में देर नही लगती…’; धनंजय मुंडे यांचा भाजपवर हल्लाबोल

मुंबई |  सत्तेचा गैरवापर करून विरोधी पक्षांच्या नेत्यांना फोडण्याची एक अनिष्ठ राजकीय परंपरा महाराष्ट्रात भाजपा-सेनेच्या सरकारने सुरू केली आहे. सरकार येत असतात, जात असतात… बाजी पलटने में देर नहीं लगती, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

आघाडीचं सरकार आल्यास या भ्रष्ट नेत्यांवर कारवाई करण्यासाठी आम्ही सत्तेचा गैरवापर करणार नाही. परिस्थिती अशी येईल की भ्रष्ट नेत्यांना एक दिवसही स्वपक्षात राहणे अवघड होऊन जाईल, असं ते म्हणाले.

कुणी कुठल्या कारणाने आमच्या पदाधिकाऱ्यांवर दबाव टाकले, हे येत्या काळात स्पष्ट होईल. शिवसेना भाजपने कितीही आमिष देऊन पक्षातले नेते फोडले तरी आम्हाला काही फरक पडत नसतो, असंही मुंडे म्हणाले.

राष्ट्रवादी पक्ष हा पुरोगाम्यांचा पक्ष आहे. तो कुणी कुठे गेले म्हणून संपणार नाही. याउलट तो आणखी पाय रोवून उभा राहिल, असंही मुंडे म्हणाले.

दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते पक्षाला सोडचिठ्ठी देऊन सत्ताधारी भाजप-शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-“शरद पवारांच्या बाजूने एकतरी माणूस शिल्लक राहतो का बघा”

-“फडणवीस साहेब, भाजपची मेगाभरती थांबली असेल तर बेरोजगारीच्या भरतीकडे जरा पहा”

-भाजपसाठी मोकळ रान; काँग्रेस-जेडीएसचे 14 बंडखोर आमदार अपात्र घोषित

-भाजपात प्रवेश का चालू आहेत याचा जरा विचार करा; उगीच सहानभूती मिळवू नका- चंद्रकांत पाटील

-“पळपुट्यांना पळू द्या… आपण एकलव्य आहोत; विधानसभा जिंकून साहेबांना गुरूदक्षिणा देऊ”

IMPIMP