…तर फडणवीस साहेब, तुम्हाला तुमची यात्रा पुढे नेण्याचे धाडसही होणार नाही!

मुंबई |  देवेंद्र फडणवीस यांच्या ‘महाजनादेश’ यात्रेला गुरुवारी मोझरी (जि.अमरावती) येथून सुरुवात झाली. त्यांच्या यात्रेला राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत पण त्याचबरोबर त्यांच्या यात्रेवर टीकाही केली आहे.

मुख्यमंत्री महोदय, तुमच्या यात्रेला शुभेच्छा! जमल्यास आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना, कर्जमाफीच्या नावावर फसवणूक केलेल्या शेतकऱ्यांना, उद्ध्वस्त झालेला कष्टकऱ्यांना, बेरोजगारीने पिचलेल्या तरुणांना भेट द्या. तुम्हाला तुमची यात्रा पुढे नेण्याचे धाडसही होणार नाही, असं धनंजय मुंडे म्हणाले आहेत.

भाजपची आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन ‘महाजनादेश’ यात्रा सुरू झाली आहे. अमरावतीतल्या मोझरी गावातून या यात्रेची सुरूवात झाली आहे.

भाजपच्या या यात्रेला प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्रवादीने देखील शिवस्वराज्य यात्रेचं आयोजन केलं आहे. शिवस्वराज्य यात्रेची धुरा शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. तर साताऱ्याचे खासदार आणि छत्रपतींचे वंशज उदयनराजे भोसले स्टार कॅम्पेनर म्हणून या यात्रेत सहभागी होणार आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-विजय वडेट्टीवार यांचा शिवसेनेबाबत मोठा गौप्यस्फोट! राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ

-जितेंद्र आव्हाडांच्या बोचऱ्या टीकेला शिवेंद्रराजेंचं खरमरीत प्रत्युत्तर!

-“शरद पवार हृदयात आहेत असं म्हणणाऱ्यांचं हृदय मला चेक करावं लागेल”

-शरद पवारांनी माझं सरकार पाडलं, सर्वांना त्रास दिल्यानेच आज त्यांची अवस्था अशी!

-नेते सोडून गेले म्हणून राष्ट्रवादीने फोडले फटाके!