मुख्यमंत्र्यांनी काम केलंय तर महाजनादेश यात्रा काढण्याची गरजच काय?; धनंजय मुंडेंची सडकून टीका

किनवट |  पश्चिम महाराष्ट्राल्या सांगली कोल्हापूरातला महापूरामुळे स्थगित केलेली राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा सोमवारपासून पुन्हा एकदा सुरू झाली आहे. या यात्रेदरम्यान राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे सत्ताधारी भाजपवर आणि मुख्यमंत्र्यांवर तुटून पडत आहेत. आज यात्रा नांदेडच्या किनवट मतदारसंघात पोहचली. यावेळी केलेल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी काम केलंय तर महाजनादेश यात्रा काढण्याची गरजच काय आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

जर काम केले असते तर मुख्यमंत्र्यांना जनतेने डोक्यावर घेतले असते, पण ते फसवे निघाले, अशा शब्दात त्यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं.

वर्षांत जर मुख्यमंत्र्यांनी लक्ष देऊन काम केलं असतं तर त्यांना महाजनादेश यात्रा काढावीच लागली नसती. जनतेने आनंदाने त्यांना मतदान केलं असतं. पण मुख्यमंत्र्यांना आपण केलं नाही हे कळून चुकलंय म्हणून ते यात्रा काढत फिरत आहेत, असं ते म्हणाले.

धनंजय मुंडेंच्याच सूरात सूर मिसळत राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनीही मुख्यमंत्र्यांवर शरसंधान साधलं. काम केली तर ते सांगण्याची गरज पडत नाही. उलट काम नाही केली तर ती उर बडवून सांगावी लागतात, अशी टीका त्यांनी केली.

देवांचा राजा इंद्र आणि महाराष्ट्राचा राजा देवेंद्र, अशा प्रकारचे बॅनर सध्या जिल्ह्याजिल्ह्यात बघायला मिळत आहेत. रेणुका मातेच्या साक्षीने सांगतो की, चंद्र-सूर्य असेपर्यंत महाराष्ट्राचे राजे एकच… छत्रपती शिवाजी महाराज… असा खोडसाळपणा यापुढे सहन केला जाणार नाही, अशा आक्रमक शब्दात खासदार अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं.

आम्ही पाच वर्षे काही स्वस्थ बसलो नव्हतो. पाच वर्षे आम्ही राज्यभरात फिरलो. लोकांना काय हवंय काय नको हे आम्हाला माहिती आहे. तेव्हा या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, आम्हाला येणाऱ्या निवडणुकीत संधी द्या, असं आवाहन अजित पवार यांनी केलं.

महत्वाच्या बातम्या-

-यु ब्रॉडबॅन्डची इंटरनेट सेवा… पुणेकर म्हणतात नको रे देवा….!

-शिवसेना प्रवेशांच्या चर्चांवर खासदार सुनिल तटकरे संतापले; म्हणतात…

-पी. चिदंबरम यांच्या बचावासाठी राहुल- प्रियांका मैदानात!

-वाढदिवशीच काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील राजकीय भूकंप करणार???

-असा असेल उत्तर प्रदेशच्या मंत्रिमंडळाचा विस्तार!