उस्मानाबाद | एकेकाळी पवारांच्या अतिशय जवळचे आणि विश्वासू नेते असलेले राणा पद्मसिंह पाटील आणि जगजितसिंह पाटील यांनी भाजपत प्रवेश करून राष्ट्रवादीला मोठा दणका दिला. त्यांचा भाजप प्रवेश राष्ट्रवादीच्या जिव्हारी लागलाय. एकीकडे राणा पाटलांचा भाजपप्रवेश पुत्रप्रेमापोटी झालाय, अशी टीका सुप्रिया सुळेंनी केली तर राणा पाटलांचा भाजपप्रवेश हा त्यांच्या पत्नीच्या प्रेमापोटी झालाय, अशी खोचक टीका राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.
शरद पवार मंगळवारी सोलापूर आणि उस्मानाबाद दौऱ्यावर होते. यावेळी त्यांच्यासोबत धनंजय मुंडेदेखील उपस्थित होते.
उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादीने घेतलेल्या पत्रकार परिषदेत धनंजय मुंडे यांनी गयारामांवर जोरदार तोफ डागली. तसंत कार्यकर्त्यांना नव्या हिमतीने कामाला लागण्याचं आवाहन केलं.
जे गेलेत ते इतिहास जमा होतील. नाही तरी आता महिन्याभरावर निवडणूक आलीच आहे. जे गेलेत त्यांची चर्चा थांबवा आता… जे येणार आहेत त्यांची चर्चा करा… त्यांतही ज्यांना जायचंय तर जा…. पण पाया पडण्याइतका स्वाभिमान गहान ठेऊ नका, असं म्हणत पवारांनी देखील राणा पाटलांना लक्ष्य केलं.
मी आणखी काही म्हातारा झालो नाही… आणखी बऱ्याच जणांना घरी बसवायचंय, असा सूचक इशारा देखील यावेळी शरद पवार यांनी गयारामांना दिला.
महत्वाच्या बातम्या-
अन्यथा मी तुमचं पितळ उघडं पडतो…. ; धनंजय मुंडेंचं मुख्यमंत्र्यांना ओपन चॅलेंज! https://t.co/6guLVXChhi @dhananjay_munde @Dev_Fadnavis #Nanar
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 18, 2019
भाजपच्या या आमदारावर खोट्या सह्या दाखवल्याप्रकरणी गुन्हा दाखल; अडचणीत वाढ https://t.co/dcXRoMmAiC @thobmre @BJP4Maharashtra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 18, 2019
अंगणवाडीच्या आशा सेविकांच्या मानधनात 2 हजार रूपयांची तुटपुंजी वाढ! https://t.co/JeBEa9qcGP
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 18, 2019