“…आता भाजपच्या बोलक्या बाहुल्याचा खेळ सुरू आहे”

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाच्या राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेची इस्लामपूर येथील जाहीर सभा पार पडली. यावेळी राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांनी जोरदार भाषण करून भाजपवर एकच हल्लाबोल केला.

मंत्री धनंजय मुंडे यांनी यावेळी बोलताना मनसे प्रमुख राज ठाकरेंवर सडकून टीका केली आहे. पूर्वी रामदास पाध्याय यांचा बोलक्या बाहुल्यांचा खेळ प्रसिद्ध होता. आता भाजपच्या बोलक्या बाहुल्याचा खेळ सुरू आहे. अर्धवटरावांचा खेळ सुरू आहे, असं म्हणत धनंजय मुंडे (Dhanjay Munde) यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackery) यांची अर्धवटराव म्हणून खिल्ली उडवली.

पूर्वी रामदास पाध्याय यांचा बोलक्या बाहुल्यांचा खेळ प्रसिद्ध होता. आता भाजपच्या बोलक्या बाहुल्याचा खेळ सुरू आहे, अशी बोचरी टीका धनंजय मुंडे यांनी राज ठाकरेंवर केली आहे.

अर्धवटरावांचा खेळ सुरू आहे. अर्धवट राव आधी भाजपविरोधात खूप बोलायचे, सीडी लावायचे. एकदा ईडी घुसली आणि अर्धवटराव गप्प बसले, असा सणसणीत टोल धनंजय मुंडे यांनी लगावला.

सभेत बोलताना राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी देखील राज ठाकरेंवर निशाणा साधला. शिवरायांच्या राजमुद्रेचा वापर करतात, पण ती प्रत्येक शिवभक्ताच्या तोंडी पाट असली पाहिजे. तुम्ही जर रामाचे खरे भक्त असाल तर केंद्रातील झेड सेक्युरिटी नाकारून अयोध्येला जावून दाखवा, असं मिटकरी म्हणालेत.

राज ठाकरे यांना फुले शाहू आंबेडकर यांच्या नावाची अॅलर्जी आहे का? असं म्हणत अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांची खाज ठाकरे म्हणून खिल्ली उडवली.

महत्त्वाच्या बातम्या- 

गुणरत्न सदावर्तेंबाबत सरकारी वकीलांचा मोठा खुलासा! 

‘मी मोदींना मारु शकतो’ म्हणणाऱ्या नाना पटोलेंच्या अडचणीत वाढ! 

विराटचं लक नाय गड्या! आयपीएलमध्ये चौथ्यांदा ‘गोल्डन डक’ झाला; पाहा व्हिडीओ

“उद्धव ठाकरेंच्या मागं साडेसाती लागली, त्यांनी हनुमान चालिसा म्हणावी नाहीतर…”

 चेहऱ्यावर स्मित हास्य अन् डोळ्यात पाणी; हवाई सुंदरीचा भावनिक व्हिडीओ व्हायरल