मुंबई | राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी शिवसेनेवर घणाघाती टीका केली आहे. वाघाची कुत्र्यासारखी अवस्था झालीये, असं म्हणत त्यांनी शिवसेनेवर जोरदार तोफ डागली.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते मराठवाडा दौऱ्यावर आहेत. यावेळी ते बोलत होते. शिवसेनेनर टीका करताना त्यांनी एका वाघाची आणि एका मुलीची गोष्ट सांगितली.
जंगलात एक वाघ राहत होता. त्याचं एका मुलीवर प्रेम होतं. एके दिवशी त्यांची भेट झाली. भेट झाल्यावर मुलगी वाघाला म्हणाली मला तुझे दात लागतील ना… वाघ मुलीचं म्हणणं ऐकतो आणि दात पाडून येतो. नंतर पुन्हा त्या दोघांची भेट होते. मुलगी परत म्हणते मला तुझी नखं लागतील ना… वाघ सगळी नखं काढतो. मग त्या वाघाच्या लक्षात येतो, अरे आपण तर जंगलाचे राजे आता शिकार करायची कशी आणि खायचं कसं…. असं सांगत आता वाघ कोण आणि मुलगी कोण हे विचारू नका, असं धनंजय मुंडे म्हणाले.
शिवसेना आणि भाजपची जागावाटपासंबंधीची भूमिका आणखी काही ठरत नाहीये. दोन्ही पक्षांना आपापल्या महत्वकांक्षा असल्याने कुणीही कमीपणा घ्यायला तयार नाहीये. यावरही धनंजय मुंडेंनी प्रहार केले.
दरम्यान, केंद्रिय निवडणूक आयोगाने शनिवारी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलंय. याच पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे.
महत्वाच्या बातम्या-
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी केलं ‘हे’ महत्वपूर्ण आवाहनhttps://t.co/zvqQ5M2CbE @Dev_Fadnavis
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 22, 2019
पितृपक्षानंतरच सेना-भाजप युतीची घोषणा??? – https://t.co/TTsmU02FN6 @uddhavthackeray @AmitShah @BJP4Maharashtra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 22, 2019
“जे सोडून गेले त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ; आपण उगवतीचा इतिहास घडवणारे आहोत” https://t.co/bmVoTSlGaQ @PawarSpeaks @NCPspeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 22, 2019