कार्यकर्त्याला भाषणादरम्यान अश्रू अनावर ; धनंजय मुंडेंनी दिला धीर

पुणे : एका कार्यकर्त्याला त्याच्या पहिल्याच भाषणादरम्यान रडू कोसळल्याचं पाहून राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी त्या कार्यकर्त्याला धीर दिल्याचं पहायला मिळालं. 

अजित पवार यांच्या अभिष्टचिंतनानिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित कार्यक्रमात हा प्रसंग घडला. यावेळी धनंजय मुंडे यांनी कार्यकर्त्याला पाठीवर थाप देत त्याला प्रोत्साहन दिलं.

शेखर ओव्हाळ हे धनंजय मुंडेसमोर पहिल्यांदाच भाषण करत होते. यामुळे भावनिक होऊन शेखर त्यांच्या तोंडातून शब्द न फुटता हुंदके आले. हे पाहुन व्यासपीठावर बसलेल्या धनंजय मुंडेंनी स्टेजवर जाऊन त्यांना धीर दिला.

ओव्हाळ यांचं भाषण ऐकल्यांनंतर धनंजय मुंडेंनी त्यांच्या पहिल्या भाषणाच्या आठवणीला उजाळा दिला. त्यांनी त्यांच्या पहिल्या भाषणावेळीचा किस्सा यावेळी सर्वांसमोर सांगितला. 

ओव्हाळ यांचं भाषण ऐकून मला माझं पहिलं भाषण आठवलं. 1995 ला मराठवाडा कृषी विद्यापीठात विद्यार्थ्यांकडून माझा सत्कार झाला होता. तेव्हा माझं पहिलं भाषण झालं होतं, असं धनंजय मुंडेंनी सांगितलं आहे. 

जेव्हा माईक हातात आला तेव्हा मी तर भाषणच विसरून गेलो होतो. त्यानंतर मनात आलं ते बोलत गेलो, असं धनंजय मुंडेंनी म्हटलं आहे. 

महत्वाच्या बातम्या-

-…म्हणून लक्ष्मण मानेंविरोधात 35 कोटींचा मानहानीचा दावा दाखल

-कर्नाटकचं राजकीय नाट्य अखेर संपलं; कुमारस्वामी सरकार कोसळलं

-अजितदादांना मुख्यमंत्रिपदाची भेट द्या; धनंजय मुंडेंचं भावनिक आवाहन

-“नितीन गडकरी देशात सर्वात चांगलं काम करणारे मंत्री”

-“भाजपने नाही तर बंडखोरांनी माझ्या पाठीत खंजीर खुपसला”