अजितदादांना मुख्यमंत्रिपदाची भेट द्या; धनंजय मुंडेंचं भावनिक आवाहन

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासाची वीट रचणाऱ्या अजितदादांना या शहरानं खाली पहायला लावलं, मात्र ही कसूर भरुन काढा. अजितदादांच्या एकसष्ठीला त्यांना मुख्यमंत्रिपदाची भेट द्या, असं भावनिक आवाहन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलं आहे. 

अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये खास कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात धनंजय मुंडे बोलत होते. शहराध्यक्ष संजोग वाघेरे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, प्रशांत शितोळे, वैशाली काळभोर, राजू मिसाळ, मोरेश्वर भोंडवे आणि भाऊसाहेब भोईर यावेळी उपस्थित होते.  

शहराच्या जडणघडणीत हातभार लावणाऱ्या मान्यवरांचा यावेळी सन्मान करण्यात आला, तसेच ‘पिंपरीचे शिलेदार’ या पुस्तकाचं प्रकाशनही धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आलं. 

आपल्या भाषणात धनंजय मुंडे यांनी पक्ष सोडून गेलेल्या आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. “पक्ष सोडून गेलेल्यांना त्यांची जागा दाखवायला हवी होती, अशी माझी इच्छा होती”, असं ते म्हणाले.

दरम्यान, शरद पवार आणि अजित पवार यांचं त्यांनी यावेळी कौतुक केलं.

पिंपरी-चिंचवड शहराच्या जडणघडणीत दोनच नावं घेतली जातात. शरद पवार आणि अजित पवार. एका पिढीने शहराचा पाया रचला तर दुसऱ्या पिढीने त्यावर कळस चढवला. शहरवासियांचे दरडोई उत्पन्न वाढवले, मात्र मतांच्या निवडणुकीत शहरवासियांनी त्यांनाच मान खाली घालायला लावली, असंही ते यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

-“नितीन गडकरी देशात सर्वात चांगलं काम करणारे मंत्री”

-“भाजपने नाही तर बंडखोरांनी माझ्या पाठीत खंजीर खुपसला”

-पंतप्रधान नरेंद्र मोदींना संसदेत भेटायला आला ‘हा’ खास मित्र

-त्या २ जागा द्या, नाहीतर नागपुरात मुख्यमंत्र्यांसह सर्व जागा पाडू; शिवसेनेचा इशारा

-“मोठं होण्यासाठी चंद्रकांत पाटलांकडून शरद पवारांवर टीका सुरु”