“पवार साहेबांचा नाद कधी करायचा नाय… राष्ट्रवादीला संपवणं सोपं नाही”

जालना |  भगवान की लाठी जब चलती है तब… साहेबांचंही तसंच आहे… मारत नाही पण मार बसला की तो पुन्हा उठत नाही. म्हणूनच पवार साहेबांचा नाद कधी करायचा नाही. राष्ट्रवादीला संपवणे काही सोपे नाही, असं परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. जालन्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सभा पार झाली. यावेळी धनंजय मुंडे बोलत होते.

तरुणांना रोजगार नाही, कारखाने, कंपन्या बंद पडत आहेत असा नकारात्मक सूर लोकांच्या मनी जाणवला. हे सरकार बरखास्त केल्याशिवाय आता आपल्याला शांत राहायचं नाही, असं ते यावेळी म्हणाले.

मोदी सरकारची फसवी नोकरभरती ही मुळात तरुणांसाठी नव्हतीच. ती तर त्यांच्या पक्ष भरतीची जाहिरात होती हे आता सिद्ध झाले आहे, अशी टीका त्यांनी सरकारवर केली.

खोट्या आश्वासनांचं गाजर देत मोदींनी तरूणांना वेडं करून सोडलं होतं. आतातरी शहाणे व्हा. डोळे उघडा. आणि त्या मोदींचा नाद सोडा, असंही ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-