शरद पवारांचे पाय मराठवाड्याला अन् मराठवाड्यात धो-धो पाऊस बरसला- धनंजय मुंडे

हिंगोली : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे मराठवाड्याला पाय लागले आणि मराठवाड्यात धोधो पाऊस बरसला असल्याचं वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केलं आहे. अमित शहांनी पवार साहेबांवर आरोप केला, साहेबांनी जेवढे विमानतळ काढले तेवढे तुम्हाला गुजरातमध्ये बसस्टँड सुद्धा काढता आले नाहीत, अशी टीकाही धनंजय मुंडे यांनी भाजपवर केली आहे.

गुरुवारी शरद पवार हे हिंगोलीच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी बोलत असताना धनंजय मुंडे यांनी हे वक्तव्य केलं आहे.

उदयनराजे महाराज यांच्या दिल्लीतील भाजप प्रवेशाला किमान पंतप्रधान यायला पाहिजे होते, महाराजांचा प्रवेश कुणाच्या हातून झाला, जनतेतून उत्तर आलं. तडीपाराच्या हातून, हा आमच्या महाराष्ट्राचा अपमान आहे. असंही धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.

भाजपचे अध्यक्ष म्हणतात भाजप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला संपवून टाकणार. आमच्यासारखे खमके मावळे पवार साहेबांच्या पाठिशी आहेत तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे, पवार साहेबांचे विचार संपणार नाहीत, असंही मुंडे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, शरद पवार महाराष्ट्रभर दौरा करत आहेत. विरोधकांवर तोफ डागत आहेत. 

महत्वाच्या बातम्या-