मुंबई | राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपत जाण्याचा निर्णय जाहीर केला आहे. राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का मानण्यात येतोय. मात्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मावळे म्हणून जिगरबाजपणे लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
राजे गेले… सेनापती गेले… आता आम्ही मावळे लढणार, अशी खमकी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी दिली आहे. काल पवारांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत उदयनराजे भाजप सरकारविरोधात आक्रमक दिसून आले. पण आज नेमकं काय झालं? हे कळायला मार्ग नाही, असं ते म्हणाले.
उदयनराजे भोसले यांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय त्यांनी का घेतला? ते माहित नाही. रयतेची काळजी असलेले राजे गेले, सेनापती गेले आता आम्ही मावळे लढू, असंही ते म्हणाले आहेत.
जीएसटी, मंदी, बेरोजगारी या सगळ्या विषयांवर गुरूवारच्या बैठकीत चर्चा झाली. हे सरकार चांगलं काम करत नसल्याचं उदयनराजे म्हणाले होते. मात्र हे सरकार राजकीय भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी पक्ष नेते सोडून चालले आहेत. पक्षाच्या कार्यकर्ते आणखी पक्षात आहेत. त्यांच्याच जीवावर राष्ट्रवादी तरेल, असंही ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या-
फडणवीस मंत्रिमंडळातील ‘या’ तीन मंत्र्यांना न्यायलयाचा दिलासा!https://t.co/odg3LvEb7P @BJP4Maharashtra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 13, 2019
“शिवाजी महाराजांनंतर खरा जाणता राजा पंतप्रधान नरेंद्र मोदी” https://t.co/bUJRgJ2yg0 @ahir_hansraj @narendramodi
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 13, 2019
विधानसभा निवडणुकीबाबत मनसेच्या बैठकीत मोठा निर्णय! https://t.co/AyUVZIpu1w @mnsadhikrut @RajThackeray
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 13, 2019