मुंबई | राजे, सरदार कितीही गेले तरी सामान्य जनतेच्या जीवावर राष्ट्रवादी काँग्रेस तरेल. पवारसाहेबांनी इतका जीव लावूनही ते पक्ष सोडत असतील तर प्रवेश दुर्दैवी आहे, अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी उदयनराजेंच्या पक्षप्रवेशावर टीका केली आहे.
भाजपने अत्यंत खआलच्या पातळीवरचं राजकारण चालू केलं आहे. नेत्यांना ईडी आणि सीबीआयची भिती दाखवली जात असल्याचा आरोप, मुंडे यांनी केला.
प्रत्येक जण प्रवेश करताना काहीतरी दबावामुळे जातोय. जनता् ही राष्ट्रवादीबरोबर कायम राहते. प्रत्येक नेत्याला वाटतं की त्यांनी पक्ष सोडला म्हणजे जनता त्यांच्याबरोबर जाईल. पण असं होत नाही, असंही ते म्हणाले.
उदयनराजेंनी काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली. त्या बैठकीनंतर विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडेंनी उदयनराजे भाजपत जाणार नसल्याची प्रतिक्रिया दिली. मात्र त्यांचं हे विधान आज राजेंनी खोटं ठरवलं.
दरम्यान, आज रात्री 8 वाजता उदयनराजे लोकसभा अध्यक्षांकडे आपला राजीनामा सादर करतील आणि उद्या पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत ते भाजपत प्रवेश करतील.
महत्वाच्या बातम्या-
“मला फक्त 15 दिवस द्या, रेल्वे प्लॅटफॉर्मवर एकही टॅक्सीवाला दिसणार नाही” – https://t.co/ExtJlgO8OT @Nitin_Nandgaokar @supriya_sule
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 13, 2019
उदयनराजेंनी भाजपप्रवेश जाहीर केला अन् धनंजय मुंडे तोंडघशी पडले! https://t.co/OhFAH9Dcxs @Chh_Udayanraje @dhananjay_munde
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 13, 2019
तिकीट नाही दिलं तर शिवसेना द्यायला तयार; राष्ट्रवादीच्या या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट https://t.co/G2OMy57x50 @NCPspeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 13, 2019