धनंजय मुंडे यांच्याविरोधातील तक्रार मागे, मात्र ‘या’ कारणामुळे होणार कारवाई?

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात केलेली बला.त्काराची त.क्रार रेणू शर्मा या महिलेनं मागे घेतली आहे. तीने यासंदर्भात मुंबई पोलिसांना प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे, त्यामुळे या प्रकरणात धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाल्याचं मानलं जात आहे.

धनंजय मुंडे यांच्यावर टांगती असलेली कारवाई यामुळे टळणार आहे, असं असलं तरी हे प्रकरण लगेचच धनंजय मुंडे यांची पाठ सोडेल अशी शक्यता नाही. कारण भाजपने हा मुद्दा पुढे रेटण्याचा निर्णय घेतला आहे आणि धनंजय मुंडे त्यांच्या निशाण्यावर देखील आहेत.

रेणू शर्माने बला.त्काराचे आ.रोप करताच धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या सर्व प्रकरणावर आणखी धक्कादायक खुलासा केला होता. रेणू शर्मा यांची बहीण करुणा शर्मांसोबतचे संबंध त्यांनी जाहीरपणे मान्य केले होते, तसेच आपल्याला दोन अपत्ये असल्याचं आणि त्यांना आपलंच नाव दिलं असल्याचंही जाहीर केलं होतं.

धनंजय मुंडे यांच्या या खुलाश्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. बला.त्कार प्रकरण एकीकडे, तर निवडणूक प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याचं प्रकरण दुसरीकडे तापण्यास सुरुवात झाली होती. रेणू शर्मा प्रकरणी धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी तर भाजपकडून करण्यातच आली होती, मात्र निवडणूक प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्या प्रकरणी त्यांची आमदारकी रद्द व्हावी, यासाठी देखील प्रयत्न केले जात होते.

दरम्यान, आता रेणू शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप मागे घेतले आहेत, त्यांनी यासंदर्भातील त.क्रार मागे घेण्याची विनंती पोलिसांकडे केली आहे. मुंबई पोलिसांनी याप्रकरणी त्यांना एक प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितलं होतं. त्यानूसार त्यांनी ते सादर केलं आहे आणि त्यात कौंटुंबिक कारणास्तव आपण ही त.क्रार मागे घेत असल्याचं म्हटलं आहे.

धनंजय मुंडे यांच्यावर का कारवाई होऊ शकते?-

धनंजय मुंडे यांनी रेणू शर्मा प्रकरणात खुलासा करताना आपलं दुसरं लग्न झाल्याचं कबुल केलं नसलं तरी आपल्याला त्यांच्यापासून दोन मुलं असल्याचं आणि त्यांना आपलंच नाव दिल्याचं स्पष्ट केलं आहे, याच स्पष्टीकरणामुळे येत्या काळात धनंजय मुंडे यांच्यासमोरील अडचणी वाढू शकतात.

निवडणूक प्रतिज्ञापत्रात सत्य माहिती देणं प्रत्येक उमेदवाराला बंधनकारक असतं, जर एखाद्या उमेदवाराने आपली पत्नी किंवा मुलांबद्दल माहिती लपवली तर त्याच्यावर अपात्रतेची कुऱ्हाड कोसळल्याशिवाय राहात नाहीत. निवडणूक आयोगाला यासंदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार आहे.

निवडणूक आयोग कारवाई करणार?

धनंजय मुंडे यांनी प्रतिज्ञापत्रात आपल्या या दोन मुलांची माहिती न दिल्याचा आरोप केला जातोय. यासंदर्भात भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे, मात्र अजून तरी निवडणूक आयोगानं यासंदर्भात काही पाऊल उचलल्याचं दिसत नाही.

निवडणूक आयोग स्वतःहून याप्रकरणी दखल घेऊ शकतो, किंवा कुणी तक्रार केल्यानंतर संबंधित तक्रारीची दखल घेऊन चौकशी करुन त्यानंतर कारवाई करु शकतो. यामधील निवडणूक आयोगानं अशा प्रकरणात स्वतःहून दखल घेतल्याची प्रकरणं फार कमी आहेत. त्यामुळे निवडणूक आयोग स्वतः दखल घेईल आणि या प्रकरणात कारवाई करेल, ही शक्यता फारच कमी आहे.

दुसऱ्या प्रकारात भाजप कारवाईची मागणी करताना दिसतोय, मात्र त्या मागणीमध्ये तेवढा जोर दिसत नाही. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई व्हावी, अशी भाजपच्याच वरिष्ठांची इच्छा नाही की काय?, असा सवाल उपस्थित होतोय.

धनंजय मुंडे सध्यातरी या प्रकरणातून सहीसलामत सुटणार असल्याचं दिसत आहे. रेणू शर्मांनी त.क्रार मागं घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या प्रकरणासंदर्भात भाष्य केलं आहे. सत्यता पडताळून पाहिल्याशिवाय निष्कर्षापर्यंत यायला आमचा विरोध होता, ते खरं ठरलं आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद सुखरुप असल्याचं दिसतंय.

दुसरीकडे निवडणूक आयोग या प्रकरणात कारवाई करेल, ही शक्यताही दिसत नाही. मात्र हे कुणी ठामपणे सांगू शकणार नाही. या प्रकरणात आणखी काही घडलं तर कदाचित चित्र बदलू शकतं. त्यामुळे आता जरी वाटत नसलं तरी पुढचे काही दिवस धनंजय मुंडे यांच्यावरील ही कारवाईची त.लवार टांगतीच राहणार आहे, एवढं मात्र नक्की…

महत्त्वाच्या बातम्या-

पुण्यातील या हॉटेलची संपूर्ण देशात चर्चा; थाळी संपवली तर देत आहेत बुलेट गिफ्ट!

शरद पवारांनी आपलं वजन वापरलं, भारतीय खेळाडूंना होणार ‘हा’ मोठा फायदा!

से.क्स रॅकेटवर पोलिसांचा छा.पा, चक्क ‘ही’ अभिनेत्रीच तेथे आढळल्याने उडाली मोठी खळबळ

रहाणेचं नाव ‘अजिंक्य’ कसं पडलं?; वडिलांनी सांगितला गमतीदार किस्सा

ऑस्ट्रेलियाचा माज काही आत्ताचा नाही; शरद पवारांचाही केला होता अपमान, पाहा व्हिडीओ