…म्हणून आदित्य ठाकरेंना पेंग्विन म्हणतात- धनंजय मुंडे

वाशिम : पेंग्विगचं पिल्लू मेल्यानंतर आदित्य ठाकरेंच्या डोळ्यातून पाणी आलं. त्यामुळं त्यांना मुंबईत पेंग्विन म्हणतात, असं म्हणत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शिवसेनेच्या जनाशिर्वाद यात्रेवर सडकून टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेत धनंजय मुंडे यांनी भाजप आणि शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल करताना दिसत आहेत. 

जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचा एकेरी उल्लेख केल्यानंतर आता त्यांनी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे. वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथील सभेत ते त्यांनी धनंजय मुंडेंनी सत्ताधाऱ्यांवर तोफ डागली आहे. 

भाजप सरकारने गेल्या पाच वर्षात सर्वांच्या अपेक्षाभंग केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या नागपूरमध्ये रोज हत्या होत आहेत. यावरुन आपण किती सुरक्षित आहोत हे स्पष्ट होतं. दिवसाला 5-6  शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि सरकार मात्र महाजनादेश यात्रा काढत आहेत, असं धनंजय मुंडे म्हणाले आहेत. 

आमचं सरकार आणा. सरसकट सातबारा कोरा करु तसेच राज्यातील लाखो जागा भरु. ज्यामुळे तरुणांना रोजगार मिळेल, असं आवाहनही धनंजय मुंडे यांनी केलं आहे. 

शिवसेनेची जनाशिर्वाद यात्रा तर भाजपची महाजनादेश यात्रा सुरु आहे. मुख्यमंत्री यात्रेत पाच वर्षात सरकारने केलेली काम सांगत आहेत. ती कामं त्यांच्या पुण्यावान कार्यकर्त्यांनाच दिसतात, असंही धनंजय मुंडे म्हणाले आहेत. 

महत्वाच्या बातम्या-

-अभिनंदन यांचा छळ करणाऱ्या पाकिस्तानी कमांडोचा खात्मा

-राष्ट्रवादीला मोठं खिंडार; ‘हा’ मोठा नेता करणार भाजपमध्ये प्रवेश???

-“महाराष्ट्र सैनिकांचा तळतळाट तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही”

-राज ठाकरेंना आवडणार नाही असं काहीही करु नका- अविनाश जाधव

-उदयनराजे भाजपमध्ये आले तर त्यांचं स्वागतच- शिवेंद्रराजे भोसले