पुणे | राजकीय नेत्यांना घडाळ्याशी खेळावं लागलं. सगळ्या कार्यक्रमांची वेळ ठरलेली असते. मात्र काही वेळा ठरलेल्या कामांत काही कारणांमुळे व्यत्यय येतो आणि ते काम राहून जातं. मात्र कोणत्याही परिस्थितीत एखादं काम करायचं ठरवलं तर ते अशक्य नसतं, असं काहीसं राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या बाबतीत घडलं.
शनिवारी धनंजय मुंडे परळीच्या दौऱ्यावर होते. रविवारी जिवलग मित्राचा सत्काराचा कार्यक्रम होता. त्यांच्या मित्राला म्हणजेच डॉ. महेंद्र लोढा यांना ‘आदिवासी मित्र’ आणि लोकमतचा ‘पॉलिटिकल आयकॉन ऑफ द इअर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार होतं. परंतू शनिवारी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांना फोन करून रविवारी सकाळी भेटायला मुंबईला बोलवलं. आता फोन आल्यावर एकतर मित्राच्या कार्यक्रमाला उपस्थित राहता येणार होतं नाहीतर पक्षाध्यक्षांची भेट होणार होती. परंतू हे दोन्ही कार्यक्रम अडचणींचा सामना करत यशस्वीपणे धनंजय मुंडे यांनी पूर्ण केले.
परळीवरून मुंबईला निघायचं आणि पवारांना भेटून पुन्हा परळीला मित्राच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावायची. नांदेडवरून मुंबईला विमानाने जायचा प्लॅन ठरला. मात्र पावसामुळे मुंबईवरून येणारं विमान रद्द झालं होतं. पुन्हा बेत बदलला. औरंगाबादला गाडीने जायचं आणि तिथून मुंबईला विमानाने जायचं, असं ठरलं. मात्र पावसामुळे ते ही विमान रद्द झाल्याची माहिती मिळाली.
धनंजय मुंंडे यांच्यासमोर आता काही पर्याय शिल्लक राहिला नव्हता. आता त्यांना गाडीनेच मुंबईला जावं लागणार होतं. मग ठरलं… गाडीनेच मुंबईला जायचं! परंतू अडचणींनी इथेही धनंजय मुंडेंची पाठ सोडली नाही. लोणावळ्याच्या घाटात त्यांच्या ताफ्यातील एका गाडीला अपघात झाला. चालक आणि एक अंगरक्षकाला थोडासा मार लागला. त्यावर मार्ग काढत त्यांनी मुंबई गाठली.
ठरल्याप्रमाणे त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. आता त्यांच्यापुढे लक्ष्य होतं मुंबईहून परळीला पोहचायचं. पुन्हा धनंजय मुंडेचा ताफा सज्ज झाला. वाऱ्याच्या वेगाने ताफा परळीच्या दिशेने पुढे सरकत होता. अखेर मजल दरमजल करत ताफा परळीत पोहचला. धनंजय मुंडेंना पाहून डॉक्टरांना सुद्धा हायसं वाटलं. आणि जिवलग मित्राच्या कार्यक्रमाला पोहोचलो याचा आनंद मुंडेंच्याही चेहऱ्यावर ओसांडून वाहत होता.
दरम्यान, ठरल्याप्रमाणे कार्यक्रम सुरू झाला आणि धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणात त्यांच्या शैलीत संपूर्ण कहानी सांगितली. ही कहानी ऐकून उपस्थित लोकही अचंबित झाले.
महत्वाच्या बातम्या-
मुंबईच्या रस्त्यांवर मी आजपर्यंत एकही खड्डा पाहिला नाही; या नेत्याचा दावा! – https://t.co/PBa9gPzpnH #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 11, 2019
युवक काँग्रेस विधानसभेसाठी सज्ज; पक्षाकडे मागितल्या ‘एवढ्या’ जागा!https://t.co/plJBwHTCV5 @satyajeettambe @INCMaharashtra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 11, 2019
काश्मीरची मोहीम फत्ते केली, आत्ता आमचा पुढचा अजेंडा…- जितेंद्र सिंह – https://t.co/FwOqbrEItB @DrJitendraSingh @narendramodi
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 11, 2019