पुणे | इथे तीन असे सूर्य आहेत ज्या सूर्यांना ग्रहण लागलं होतं. पहिला मी, दुसरे आमदार निलेश लंके आणि तिसरे मावळचे आमदार सुरेश शेळके, असं सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.
आम्ही आज जे आहोत ते उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आमच्यासारख्या तरुणांवर विश्वास ठेवला म्हणून आज आम्ही तुमच्यासमोर आहोत. नाहीतर हे आयुष्यभराचं ग्रहण असतं जे कधी निघालंच नसतं. ते अजितदादांनी काढलं. ही खरी गोष्ट आहे, असंही धनंजय मुंडेंनी सांगितलं.
रोज सूर्य उगवतो आणि मावळतो. पहिल्यांदा मावळामध्ये सूर्य उगवल्यानंतर मावळणार नाही, याची जाणीव होतेय. सुनील शेळकेंनी मला मोठं भाऊ केलंय. तर अजितदादांनी सामाजिक न्यायमंत्री केलंय. वडगाव मावळमध्ये 20 तारखेला सुनील अण्णांच्या तारखेला अजितदादांनी वेळ देणं हे साधंसोपं काम नाही, असंही मुंडे म्हणाले.
वाढदिवसाला वेळ देण्यापेक्षा या वडगाव मावळवर आणि सुनील अण्णांवर अजितदादा आणि पवारसाहेबांचं एवढं प्रेम आहे की, दोन वर्षात कितीही आर्थिक संकटं आली तरी वळगाव मावळमध्ये 756 कोटी रुपये विकासकामांसाठी दिले. यासारखं वाढदिवसाचं कुठलंच गिफ्ट असूच शकत नाही, असं धनंजय मुंडे म्हणाले.
जाताजाता अजित पवार यांना मी सांगणार आहे. आमदार निलेश लंके तर बोलले. दादा आमच्याही वाढदिवसाला हजेरी लावली… तसं तुमच्या आशीर्वादाने काही कमी नाही. मला याची जाणीव आहे. ही खरी गोष्टी आहे की सुनील अण्णा आणि मी एका पक्षात काम करतो. अण्णा तो इतिहास आहे. तुम्ही-आम्ही एकत्र आहे ते भविष्यात, असं देखील धनंजय मुंडे म्हणालेत.
महत्वाच्या बातम्या-
पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; महानगरपालिकेने घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय
“माजी पोलीस आयुक्त आणि माजी गृहमंत्री यांना मस्ती आली आहे, त्यांचे कुठं हनिमून सुरू आहे?”
“मुख्यमंत्रिपद हडपण्यासाठी उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाला तिलांजली दिली”
“गाव जेवण एक दिवस देणार की पुढची तीन वर्ष देणार”
“…तर नारायण राणेंची कुंडलीच बाहेर काढू”