मुंबई | राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. येणाऱ्या काळात राज्यात मुख्यमंत्री आपलाच असेल, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.
धनंजय मुंडे हे शुक्रवारी राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांच्या मतदार संघात आले आहे होते. यावेळी ते बोलत होते.
शरद पवार (Sharad Pawar) साहेबांनी माझ्यावर विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी दिली होती. पाच वर्षे विरोधी पक्षनेता होतो आणि ती जबाबदारी पार पाडली, असं त्यांनी सांगितलं.
आज शब्द देतो सामाजिक न्याय आणि विशेष विभागाचा मंत्री म्हणून येणाऱ्या काळात सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचं मंत्रिपद द्यायचं कुणाला? जे कुणी मुख्यमंत्री असतील ते आपलेच असतील, असं मुंडे म्हणालेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. यावेळी आगामी काळात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होऊ दे, असं साकडं देवीला घातलं आहे. तसंच, मी मुख्यमंत्री व्हावं असा विचार कधी केला नाही,याचा निर्णय राज्याची जनताच घेईल, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या-
केकेच्या निधनानंतर गायिकेचा धक्कादायक खुलासा!
“मला देशात एक मजबूत विरोधी पक्ष हवाय, मी कुठल्याही पक्षाच्या विरोधात नाही”
’15 दिवस वाट पाहून…’; वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
दहावी, बारावीच्या निकालाबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली महत्वाची माहिती!
“मी जर सीडी काढली तर सगळा महाराष्ट्र हादरेल”